आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेवटच्या दिवशी 222 नामांकन अर्ज दाखल‎:पुसद बाजार समितीची निवडणूक; आता माघार कोण घेणार याकडे नागरिकांचे लक्ष‎

पुसद‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य पुणे महामंडळाच्या राज्य‎ सहकारी निवडणूक प्राधिकरणाने‎ निवडणुकीबाबत दि. २२ डिसेंबरला जीआर‎ प्रसिद्ध केला होता. त्यानुसार राज्य सहकारी‎ निवडणूक प्राधिकरणावर सोपविलेले‎ अधिकाराचा वापर करत पुसद येथील‎ बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये नामांकन‎ अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.‎ दि. ३ एप्रिलला शेवटच्या दिवशी बाजार‎ समितीच्या निवडणुकीमध्ये २२२ अर्ज‎ दाखल झाले आहे. बाजार समितीच्या‎ निवडणुकीत उभे राहण्यासाठी २७२‎ अर्जाची विक्री झाली होती विशेष.‎ पुसदच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये‎ भाजपासोबत शिंदे व ठाकरे गट एकत्र‎ आल्याचे पहावयास मिळाले आहे.

काँग्रेस‎ व राष्ट्रवादी हे स्वतंत्र निवडणूक लढणार‎ असल्याचेही ऐकावयास मिळाले आहे.‎ बाजार समितीच्या संचालक मंडळात उभ्या‎ राहणाऱ्या उमेदवारात त्रिशंकू लढत होणार‎ असल्याचे संकेत दिसू लागले आहे.‎ पुसदच्या बाजार समितीची सुमारे दहा‎ वर्षापासून निवडणुका झाल्या नव्हत्या.‎ बाजार समितीची निवडणूक घ्या, यासाठी‎ आंदोलने देखील झाली होती. यंदा बाजार‎ समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्याने‎ इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून २७२‎ अर्ज अर्जाची विक्री झाली होती. त्यापैकी‎ २२२ अर्ज सहाय्यक निबंधक सहकारी‎ कार्यालयाला प्राप्त झाले असून तब्बल ५०‎ नामांकन अर्जाचा शोध लावण्याचे मोठे‎ आव्हान सहाय्यक निबंधक तथा निवडणूक‎ निर्णय अधिकारी सुनील भालेराव‎ यांच्यासमोर उभे टाकले आहे. कार्यालयाला‎ २२२ अर्ज प्राप्त झाल्याने आता माघार कोण‎ घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले‎ आहे.‎