आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूचना:आदिवासींचा शैक्षणिक, आर्थिक स्तर वाढवण्यावर भर द्यावा : सुनील ढाले, पुसद आदिवासी प्रकल्प आढावा समितीच्या बैठकीत अध्यक्षांनी दिल्या सूचना

पुसद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय मध्यवर्ती योजना अर्थात न्यूक्लिअस बजेट योजनेत आदिवासी विद्यार्थ्यांची शैक्षणिक व लाभार्थ्यांची आर्थिक स्थिती वाढवण्याबाबत आदिवासी विकास प्रकल्प येथे आदिवासी प्रकल्प समितीचे अध्यक्ष अॅड. सुनील ढाले आदिवासी यांनी सूचना दिल्या. प्रकल्पाची आढावा बैठक अध्यक्ष सुनील ढाले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

बैठकीला समितीचे सदस्य ज्ञानेश्वर तडसे, भारत मोघे, शिवाजी खरवडे, पूजा खुडे, प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे, सहा प्रकल्प अधिकारी राजेंद्र अहिर, शेगोकार, बोराळकर, विस्तार अधिकारी चव्हाण यांच्यासह प्रकल्प कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते. पुसद प्रकल्पांतर्गत येणाऱ्या सात तालुक्यांमधील प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी नामांकित इंग्रजी माध्यम शाळेमध्ये एक हजाराहून जास्त विद्यार्थी राज्यातील विविध नामांकित शाळेमध्ये प्रवेशित आहेत .

मात्र पालकांच्या तक्रारीवरून त्यांना शिक्षणाची आणि मूलभूत सुविधा मिळत नसल्याने याबाबत संबंधित सर्व मुख्याध्यापकांची संयुक्त बैठक घेण्यासंदर्भात अध्यक्षांनी सूचना दिल्या. टी. एस.पी असणाऱ्या आदिवासीबहुल गावांमध्ये किंवा परिसरामध्ये प्रकल्प स्तरावर किमान एक कोटी रुपयाचे सामाजिक सांस्कृतिक भवन घेण्यासंदर्भात तालुक्यातून किमान चार गावे प्रस्तावित करून पाठपुरावा करावयाचे प्रकल्प अधिकारी धाबे यांनी सांगितले.

भूमिहीन दारिद्र्य रेषेखालील आदिवासींचे सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी अर्ज करण्यासंदर्भात जनजागृती करून आदिवासी शेतकऱ्यांना त्यांची जमीन विक्री काढावयाची असेल त्यांनी सबळीकरण योजनेचा लाभ घेऊन जमिनीचा मुबलक मोबदला मिळणे बाबत प्रकल्प समिती प्रयत्न करणार आहे. आदिवासी सुशिक्षितांना कॅमेरा, ड्रोन, प्रशिक्षणासह साहित्य वाटप करणे, दुचाकी, चारचाकी, मोटर दुरुस्ती प्रशिक्षण व यासाठी अर्थसाहाय्य करणे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाचे तीनशे लाभार्थी घेण्याबाबत निर्णय झाला. त्याचबरोबर पीएमटी,जेईई, नीट, एमएससीआयटीचे प्रशिक्षण शैक्षणिक सत्राच्या विहित मुदतीत घेण्याच्या सूचना ढाले यांनी दिल्या.

बातम्या आणखी आहेत...