आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासन कारवाई:पांढरकवडा शहरातील नगर पालिकेने काढले अतिक्रमण

पांढरकवडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पांढरकवडा शहरातील विविध भागात रस्त्यावर वाढलेले अतिक्रमण लक्षात घेता नगरपालिकेने वाहतूक पोलिसांच्या मदतीने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. मुख्याधिकारी राजू मोट्टेमवार यांनी विशेष लक्ष घालून पोलिस विभागाच्या मदतीने अतिक्रमण हटवण्याकरिता व रहदारीस होणारे अडथळे दूर करण्यासाठी विशेष पथक नेमून कारवाई सुरू केली आहे.

शहरातील मेन लाईन, जैन चौक, आठवडी बाजार, शिबला पॉईंट, लोहार लाईन, मस्जिद लाईन, पोलिस स्टेशन रोड, बसस्थानक, तहसील चौक अशा विविध भागात पथकासमवेत स्वतः फिरून प्रथम सर्व अतिक्रमणधारकांना सूचना देण्यात आल्या. त्यानंतर अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू केली. यावेळी वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण लिंगाडे, सहायक फौजदार इक्बाल शेख, पोलिस कर्मचारी अरुण पवार, अशोक पत्रे, निवृत्ती कुलसंगे, नरेंद्र बागेश्वर, हरिदास मानकर, अरूण दुमनवार,अशोक जाधव या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह राजू मोट्टेमवार, शहर अभियंता स्नेहल बोमकंठीवार, हर्षल पवार, स्वच्छता निरीक्षक संतोष व्यास, मंगेश चांदेकर, रितेश लाभसेटवार व नगर पालिकेचे कर्मचारी सहभागी होते.

बातम्या आणखी आहेत...