आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्वासन:लेखी आश्वासनाने उपोषणाची सांगता‎

बेलोराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुसद तालुक्यातील माळ पठारावरील‎ शेतकऱ्यांना चालू वर्षीचा पीक विमा देण्याच्या‎ मागणीसाठी अखिल भारतीय तांडा सुधार समितीने‎ हिवळणी तलाव येथे उपोषण सुरू केले होते.‎ प्रशासनाने मागणी मान्य केल्याने ते मागे घेण्यात‎ आले. अखिल भारतीय तांडा सुधार समितीचे पुसद‎ तालुका अध्यक्ष संजय आडे व सहकाऱ्यांनी २९‎ डिसेंबरपासून उपोषण व मुंडण आंदोलन सुरू केले‎ होते.

पीक विमा कंपनीचे कुंदन राठोड, तालुका‎ कृषी अधिकारी एस. व्ही. बेरड, मंडळ अधिकारी‎ व्ही. बी. राठोड, व्ही. एन. राठोड, सहायक निबंधक‎ एस. एस. भालेराव, पी. बी. चव्हाण, जी. ए. तरासे‎ यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलनाची सांगता‎ झाली. आंदोलनात संजय आडे, दुर्गादास महाराज,‎ निर्गुण चव्हाण, सुभाष राठोड, गजानन इंदोरीया,‎ कुबेरराव मस्के, सुनील चव्हाण, पवन राठोड,‎ संतोष चव्हाण, शैलेश सरगर, संतोष राठोड, पंडित‎ पवार आदी सहभागी होते.‎

बातम्या आणखी आहेत...