आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातंत्रशिक्षण संचालनालयाकडून प्रवेश प्रक्रियेस होत असलेल्या उशिरामुळे यंदा अभियांत्रिकी, विधी (लॉ) आणि फार्मसीच्या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू आहे. त्यामुळे प्रथम वर्षाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम सत्राला अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळणार नव्हता. दरम्यान, प्रवेश पूर्ण झाल्यानंतर तीन महिन्यांनी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्याने दिलासा मिळाला.
सध्या अभियांत्रिकीसह लॉ, फार्मसीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.डिसेंबरअखेरीस ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल. सुमारे अडीच महिने प्रक्रिया पुढे सरकते आहे. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसह अभियांत्रिकीच्या थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळाला आहे. या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे वेळापत्रक बदलले आहे. थिअरी व प्रात्यक्षिक असा दुहेरी अभ्यास करण्यासाठी आता पुरेसा वेळ मिळेल. विद्यापीठाने दिलासा दिला नसता तर कदाचित विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी कमी वेळ मिळाला असता. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळेल.
इतर शाखांच्या हिवाळी परीक्षा याच महिन्यात
विद्यापीठाशी संलग्न विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, आंतरविद्याशाखीय अभ्यास या विद्याशाखांतर्गत शिकवल्या जाणाऱ्या सर्व अभ्यासक्रमांच्या हिवाळी परीक्षा नोव्हेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ दरम्यान होणार आहेत. या परीक्षांचे अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. विलंब शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.