आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुतळा:राष्ट्रमाता जिजाऊंसह बाल शिवबांचा पुतळा उभारा; दीपक बोरकरांची मागणी

देऊळगावराजा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्व. बाळासाहेब ठाकरे समृध्दी महा मार्गाजवळील इंटरचेंजजवळील वाहतूक बेटावर जिजाऊ माँसाहेब यांचा बाल शिवबांसह पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी शिवसेना उपजिल्हा प्रमुख दीपक बोरकर यांनी ११ मे रोजी मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

समृध्दी महामार्ग हा सिंदखेड राजा शहराच्या जवळून गेला असून या महामार्गाचा इंटर चेंज शहराच्या जवळ आहे. त्याच इंटरचेंजमध्ये एक भव्य वाहतूक बेट निर्माण झालेले असून या अतिशय महत्वपूर्ण वाहतूक बेटावर राष्ट्रमाता जिजाऊंचे बाल शिवबांसह स्मारक व्हावे, अशी तमाम जिजाऊ भक्तांची इच्छा आहे. तरी आपण आपल्या स्तरावरून या मागणीचा विचार करावा व सदर मागणी मंजूर करावी, अशी विनंती बोरकर यांनी केली. या विषयी शिंदे म्हणाले, अशा प्रकारची मागणी जिल्हाभरातून येत असून निवेदनेही प्राप्त झाले आहेत. त्यामुळे आपली मागणी निश्चितच पूर्ण करू, असे आश्वासन त्यांनी दिले.

बातम्या आणखी आहेत...