आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:शाश्वत सुख हे वैष्णवाच्या घरी, संगतीतच मिळते; चांगदेव महाराज कंडारीकर यांचे प्रतिपादन

टेंभुर्णी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाश्वत सुख हे वैष्णवाच्या घरी व वैष्णवाच्या संगतीत मिळत असल्याचे चांगदेव महाराज कंडारीकर यांनी सांगितले. जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी येथे सुरु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात किर्तनाचे चौथे पुष्प गुंफताना ते बोलत होते. वैष्णवा संगती सुख वाटे जिवा अनिक मी देवा काही नेणे या अभंगावर महाराजांनी निरुपन केले. सध्या परमार्थाची स्थिती व खरा परमार्थ कशाला म्हणतात हे समजून सांगितले, आज जीवनामध्ये परमार्थाचे नाटक झालेले आहे.

कलियुगात खरा परमार्थ पासून माणूस दुरावला आहे परमार्थामध्ये जीवनाचे सार्थक असून शुद्ध सात्विक परमार्थ करण्यासाठी वैष्णवाची संगती आवश्यक आहे. वारकरी संप्रदायामध्ये वैष्णव संगतीत खऱ्या सुखाची अनुभूती मिळत असते. शुद्ध सात्विक परमार्थ करण्याची आता गरज आहे व तसेच लहान मुलांना संस्कार देण्याची गरज आहे .

अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून लहान बालकावर संस्कार केले जाऊ शकतात याशिवाय गावागावात सात दिवसाच्या शिबिराच्या माध्यमातून हे होऊ शकते यासाठी परिसरात बाल संस्कार शिबिर आयोजित केले तर त्यासाठी आपण उपस्थित राहून मार्गदर्शन करु, असे आश्वासन महाराजांनी दिले. कीर्तनासाठी श्री स्वामी १००८ स्वरूपानंद सरस्वती महाराज यांच्यासह आळंद, हिवरा काबली, सावरगाव, पापळ खानापूर, काळेगाव परिसरातील भाविक उपस्थित होते. दरम्यान, सप्ताहामुळे गावात धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरु असल्याने भक्तीमय वातावरण तयार झाले.

बातम्या आणखी आहेत...