आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानेर येथे असलेल्या खनिपट्ट्यातुन मुदत संपल्यानंतरही सातत्याने अवैधरीत्या उत्खनन करण्यात आले. यासंदर्भात करण्यात आलेल्या तक्रारीनंतर अप्पर जिल्हाधिकारी यांनी दखल घेत चंद्रपूर येथील पथकाकडून या खनिप्ट्ट्याची इटीएस मोजणी करुन घेतली होती. या इटीएस मोजणीच्या अहवालात अवैधरीत्या उत्खनन झाले असल्याचे नमुद आहे. त्यावरुन जिल्हा खनिकर्म विभागाने संबंधीत खनिपट्टाधारकास ७ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
नेर तालुक्यातील शासकीय गट नं. ६८ क्षेत्र १.२१ हे. आर क्षेत्रावर सुशील जैन यांना मंजुर झालेल्या खनिपट्ट्याची मुदत २४ जानेवारी २०१९ रोजी संपली होती. मात्र ३ वर्ष लोटूनही त्या खनिपट्ट्यातुन अवैधरीत्या गौण खनिजांचे उत्खनन सुरूच असल्याची करण्यात आली होती. या प्रकरणाचे गांभीर्य पाहुन अपर जिल्हाधिकारी दुबे यांनी संबंधीत खनिपट्ट्याची योग्य इटीएस तपासणी करण्यासाठी चंद्रपूर येथील वरिष्ठ उपसंचालक भूविज्ञान संचालनालय व खनिकर्म संचालनालयास पत्र देवुन मोजणी करावी आणि मोजणीचा अहवाल सादर करावा असे आदेश जिल्हा खनिकर्म विभागाला दिले होते. त्यावरुन चंद्रपूर पथकाने नेरमध्ये येवुन संबंधीत खनिपट्ट्याची ईटीएस मोजणी केली.
या पथकाने केलेल्या इटीएस मोजणीचा तांत्रीक अहवाल काही दिवसांपुर्वी जिल्हा खनिकर्म विभागास प्राप्त झाला आहे. त्यात क्षमतेपेक्षा अधिक उत्खनन केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या अहवालावरुन जिल्हा खनिकर्म विभागाने संबंधीत खनिपट्टाधारक यांना ७ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. इतकेच नव्हे तर या कारवाईसंदर्भात संबंधीत खनिपट्टाधारकास त्यांचे उत्तर सादर करण्यास सांगण्यात आले आहे. अपर जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनेवरून जिल्हा खनिकर्म विभागाच्या वतीने या प्रकरणात चौकशी सुरू करण्यात आली होती. यामध्ये सध्या दंडात्मक कारवाई करण्यात आली असुन खनिपट्टाधारकाच्या उत्तरानंतर पुढे काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.
यवतमाळ शहरालगत ही अवैध उत्खनन : यवतमाळ शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या आणि मुदत संपलेल्या एका खनिपट्ट्यामधुन सायंकाळी ६ वाजता नंतर मध्यरात्रीपर्यंत अवैधरीत्या उत्खनन करण्यात येत आहे. उत्खनन केलेल्या मालाची रात्रीतून विल्हेवाट लावण्यात येत आहे. गावामधील काही नागरिकांशी असलेले संबंध आणि शेजारी असलेल्या दुसऱ्या अधिकृत खनिपट्ट्याच्या आडोशाने हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी देखील कारवाईची मागणी आता होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.