आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी प्रशिक्षण:उद्घाटनापूर्वीच शेतकरी प्रशिक्षण केंंद्राच्या वास्तूला लागली गळती

मानोराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नैराश्याच्या गर्तेत सापडून टोकाचे निर्णय घेऊ पाहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये नवी उमेद निर्माण करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाय योजना करण्यात येत असून त्या अंतर्गत मानोरा तालुक्यातील शेंदूरजना आढाव- धानोरा रस्त्यावर वन जमिनीमध्ये लाखो रुपये खर्च करून कंत्राटदारद्वारे बांधण्यात आलेली शेतकरी प्रशिक्षण वास्तु उद्घाटनापूर्वीच गळत असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे.

तालुक्यातील अभावग्रस्त शेतकऱ्यांच्या भल्यासाठी बांधण्यात आलेल्या वास्तूमध्येही भ्रष्टाचाराची कीड शिरल्याचा अनुभव या गळक्या वास्तूकडे पाहून तालुक्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांना येत आहे. मानोरा तालुक्यातील शेतकरी मागील काही वर्षांपासून निसर्गाचा लहरीपणा, हवामान बदलाचा मार सहन करीत असल्यामुळे कधी अतिवृष्टी तर कधी अवृष्टी सामना करीत असल्याने याचा मोठा प्रभाव कृषी उत्पन्नावर पडून शासनाकडून आणि खाजगी सावकारांकडून शेती पिकवण्यासाठी घेतलेली कर्ज थकण्यात होत असते. नैसर्गिक आपत्ती सोबतच मानवनिर्मित संकटाचीही भर शेतकऱ्यांना सोसावा लागत असून ह्या अडचणीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी वाईगौळ- धानोरा रस्त्यावरील भिलडोंगर फाट्यावर हिवरा वन बिटा मध्ये शेतकरी प्रशिक्षण केंद्राची निर्मिती लाखो रुपये खर्च करून शासनाकडून निर्माण करण्यात आली आहे.

लक्षावधी रुपयाची निधी वास्तुसाठी उपलब्ध असतांनाही सदरील वास्तू शेतकऱ्यांच्या उपयोगात येण्याआधीच व उद्घाटन होण्यापूर्वी गळत असल्याचे निदर्शनास आल्यावर कृषी विभागाने मागील वर्षी पावसाळ्यात या वस्तूचे लिकेज दुरुस्त करण्याची विनंती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रीतसर करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने कृषी विभागाच्या मागणीकडे दुर्लक्ष करून शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी वास्तू बांधणाऱ्या बांधकाम कंत्राटदाराला वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे यानिमित्ताने तालुक्यातील नागरिक व शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...