आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीकास्त्र‎:खुद्द देवेंद्र फडणवीसांचीच‎ विधानसभेची जागा धोक्यात‎

यवतमाळ‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात सध्या भाजपकडून सुरू‎ असलेले लबाडीचे राजकारण त्यांच्याच‎ पथ्यावर पडत आहे. हे गलिच्छ‎ राजकारण करताना मतदारसंघाकडे‎ दुर्लक्ष झाल्याने खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र‎ फडणवीस यांची जागा धोक्यात‎ असल्याची माहिती नागपुरातील संघ‎ वर्तुळातील मित्रांनी दिल्याचे‎ खळबळजनक वक्तव्य उद्धव‎ बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते तथा‎ खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले.‎ स्थानिक विश्रामगृह येथे . २ मार्च रोजी‎ पत्रकार परिषदेत ते बोलत होते.‎ आपण खासदार असताना‎ अटलबिहारी बाजपेयी, मनमोहनसिंग‎ यांची पंतप्रधानपदाची कारकीर्द जवळून‎ बघितली आहे. मात्र त्यावेळी सुडाचे‎ राजकारण कधीच नव्हते असे सांगत खैरे‎ पुढे म्हणाले की, २०१४ मध्ये एनडीए‎ सरकार स्थापन झाल्यापासून देशात व‎ राज्यात सत्तेसाठी सुडाचे राजकारण सुरू‎ झाले. नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात सत्तेत‎ असलेल्या मित्रपक्षांना कधीच‎ सन्मानाची वागणूक मिळाली नाही.‎

खासदारांना कधीही भरीव निधी मिळाला‎ नाही. अपवाद केवळ नितीन गडकरींचा‎ राहिला. त्यांनी सर्वपक्षीय खासदारांना‎ विकासकामांसाठी निधीची कधीही‎ उणीव भासू दिली नाही. मात्र राज्यात‎ उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते गंभीर‎ आजारी होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस‎ यांनी डावपेच खेळून शिंदे व त्यांच्या‎ समर्थकांना आपल्या जाळ्यात ओढले‎ आणि शिवसेना फोडली, असा आरोप‎ खैरे यांनी केला. फडणवीस यांनी अत्यंत‎ नीच राजकारण केले. महाराष्ट्रातील सुज्ञ‎ जनता भाजपला कधीच माफ करणार‎ नाही. जनतेची नाराजी आता भाजपला‎ दिसत असल्याने त्यांच्या पायाखालची‎ वाळू सरकली आहे.

उद्धव ठाकरेंच्या‎ नेतृत्वात आमचे किमान ३८ खासदार‎ राज्यात निवडून येतील, असा विश्वासही‎ खैरे यांनी यावेळी केला. येत्या‎ निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर‎ घ्यावा, अशी आमची मागणी आहे.‎ त्यासाठी सर्वपक्षीय लढा उभारू, असे‎ त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला‎ जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड, संतोष‎ ढवळे यांच्यासह इतर पदाधिकारी‎ उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...