आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअर्धा पावसाळा संपत आलेला असला तरी येथील ग्राम पंचायत प्रशासनाने पावसाळा पूर्वीचा कोणताही नियोजन केलेला नाही. परिणामी फुलसावंगीच्या मुख्य रस्त्यातच अनेक खड्डे असलेल्या ठिकाणी पाणी साचले आहे. हे चित्र मुख्य रस्त्याचे आहे तर गाव अंतर्गत असलेल्या दुसऱ्या रस्त्यांची तर या पेक्षा ही दयनीय अवस्था झाली आहे. नाल्या तुंबल्या आहेत. नागरिकाच्या समस्यांकडे लक्ष देण्यासाठी नेते मंडळींकडे वेळच नसल्याचे बोलल्या जात आहे.
पावसाळा जसा शेतीच्या हंगामाचा तसाच आरोग्यासाठी सावधानतेचा ही काळ असतो. आपल्या शरीराच्या रचनेत पाण्याला प्रमुख स्थान आहे आणि साधारणपणाने होणाऱ्या आजारांपैकी ७० टक्के आजार हे पाण्यापासून होणारे असतात. पडणाऱ्या पावसाच्या पाण्यासोबत आजार वाढण्याची शक्यता अधिक असते. यासाठी ‘आला पावसाळा आरोग्य सांभाळा’ असे सांगितले जाते. पावसाळ्यात स्वच्छतेला विशेष लक्ष देण्याची गरज असते. त्यामुळेच पावसाळ्या पूर्वीच पावसाळ्या नियोजन म्हणून रस्त्यात असलेले खड्डे मुरूम किंवा इतर साहित्याने भरणे जेणे करून पावसाच पाणी त्यात साचून त्या पासून डासांची उत्पत्ती हाऊ नये, जे पुढे रोगराईचे कारण बनू शकते. शिवाय पाण्याचा योग्य विसर्ग व्हावा या साठी सार्वजनिक नाल्याची सफाई होणे आवश्यक असते. अन्यथा रोगराई पसरण्याची भीती नाकारता येत नाही.
ह्या सर्व उपाय योजना पावसाळ्यापूर्वी करण्याच्या असतात जे ग्राम पंचायतीकडून दरवर्षीच केले जाते. मात्र या वर्षी निम्म्या पावसाळा संपत आला असला तरी येथील ग्राम पंचायत प्रशासनाने कोणतेही उपाय योजना केलेल्या नाहीत परिणामी फुलसावंगीच्या मुख्य रस्त्यातच अनेक खड्डे असलेल्या ठिकाणी पाणी साचले आहे. हे चित्र मुख्य रस्त्याचे आहे तर गाव अंतर्गत असलेल्या दुसऱ्या रस्त्यांची तर या पेक्षा ही दयनीय अवस्था झाली आहे. नाल्या तुंबल्या आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीला उमरखेड येथून सफाई कर्मचारी बोलावण्यात आले. त्यांच्याकडून काही भाग साफ करून संपूर्ण गावाच्या नाल्या साफ करत असल्याचे आव आणण्यात आले आता तरी नाल्या साफ होतील अशी शक्यता असतांना त्या सफाई कामगारांनी काढता पाय घेतला व उर्वरित नाल्या आजच्या मितीला जशाच तशाच भरलेल्या आहेत. या अर्धवट सफाईच्या नावानेच दांडगा बिल काढण्यात आल्याची नागरिकात चर्चा पण होती. काही ग्राम पंचायत सदस्य देखरेखीच्या नावाखाली ठेकेदारीत उतरले आहे.
त्या क्षेत्रात जास्तीत जास्त काम मिळविण्याची अंतर्गत स्पर्धाच निर्माण झाली असून यातून आलेल्या नाराजग्या व मन मिलनातच सत्ताधारीचे वेळ खर्ची चालले असल्याची चर्चा नागरिकांतून केली जात आहे. तर पावसाळा अजून काही संपलेला नाही, वेळ आहे. उपाययोजना करू, अशी प्रतिक्रिया फुलसांगवी ग्रामपंचायतचे सचिव बालाजी जोगदंड यांनी दिली आहे. कोणत्याही उपाय योजना नाही : ग्राम पंचायतने दरवर्षी पावसाळ्यात क्रमप्राप्त असलेल्या उपाय योजना काही केल्या नाहीच. पण नियोजनाच्या नावाने टोपला भर मुरूम पण सत्ताधाऱ्यांनी टाकलेले नाही, असा आरोप फुलसावंगी येथील नागरिक मोहसीन खान यांनी केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.