आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायशवंत पंचायत राज अभियानांतर्गत यवतमाळ जिल्हा परिषदेच्या अभिलेखांची फेब्रुवारी महिन्यात क्षेत्रीय तपासणी पार पडली होती. दरम्यान, सोमवार, दि. ३ एप्रिल रोजी राज्यस्तरीय समितीच्या त्री सदस्यीय समितीने जिल्हा परिषदेत तपासणी केली. यात सर्वच विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या योजना आणि आस्थापना विषयक बाबीची तपासणी पार पडली. त्याचप्रमाणे सन २०२१-२२ मुल्यमापन तपासणी केली. राज्यात पंचायत राज संस्थांचे व्यवस्थापन आणि विकास कार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांना विभाग आणि राज्यस्तरावर यशवंत पंचायत राज अभियान पुरस्कार देण्यात येते.
दरम्यान, सन २०२२-२३ च्या यशवंत पंचायत राज अभियान पुरस्कारात यवतमाळ जिल्हा परिषदेला शंभर पैकी ९१.४ गुण घेत विभागातून अव्वल स्थानावर विराजमान आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे अभिलेखे तपासणी क्षेत्रीय समितीच्या वतीने फेब्रुवारी महिन्यात पार पाडली. तद्नंतर सोमवार, दि. ३ एप्रिल रोजी त्री सदस्यीय समिती जिल्ह्यात तपासणीकरीता दाखल झाली.
या समितीत नागपूरचे उपआयुक्त विवेक इलमे, पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी छत्रपाल एस. पटले, सहाय्यक संशोधन अधिकारी रमेश बागडे आदीजण उपस्थित होते. तर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंकज भोयर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रल्हाद चव्हाण, महिला व बालकल्याण अधिकारी प्रशांत थोरात यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.