आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मत:तज्ञ शिक्षक, अभ्यासू विद्यार्थी अन् जागरूक पालक हेच यशाचे गमक; डॉ. संजय बंग यांचे प्रतिपादन

दिग्रस12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा स्थानिक दिग्रस येथील विद्यानिकेतन इंग्रजी शाळेने इयत्ता दहावीची सर्वोत्कृष्ट यशाची परंपरा कायम राखून दिग्रस तालुक्यातील इंग्रजी शाळेमधून नव्हे तर इतर सर्वच शाळेतील माध्यमातून प्रथम येण्याचा मान मिळविला. यामध्ये प्रथम सायली वास्कर ९९.८० टक्के, व्दितीय कैवल्य लाखकर ९९.४० टक्के, तृतीय सृष्टी जाधव ९९.२० टक्के घेऊन उत्तीर्ण झाली.

मागील अनेक वर्षांपासून विद्यानिकेतन इंग्रजी शाळेचेच विद्यार्थी तालुक्यातून प्रथम येत आहेत हे विशेष. यासाठी शाळा टेस्ट सिरीज, शेकडो चाचणी परीक्षा, परिसंवाद, चर्चासत्र, मार्गदर्शनपर व्याख्यान असे अनेक उपक्रम दरवर्षीच राबवते तसेच या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा शाळेने सर्वच उपक्रम आभासी पद्धतीने राबविले. शाळेचे सर्वच शिक्षक उच्चविद्याविभूषित असून विद्यार्थ्यांच्या शंका निरसनासाठी अहोरात्र मेहनत करतात. तसेच शाळेतील एकूण १०० विद्यार्थ्यांपैकी ९५ टक्के व त्यापेक्षा अधिक गुण २८ विद्यार्थ्यांनी मिळविले. तर ९० टक्के पेक्षा अधिक असलेले ६९ विद्यार्थी आहेत. तसेच उर्वरित सर्वच विद्यार्थी हे प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. हे सर्वच विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय विद्यानिकेतन शाळेचे अध्यक्ष डॉ. संजय बंग, शिक्षक व पालकांना देतात.

बातम्या आणखी आहेत...