आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कारवाई:स्पिरिट, केमिकल वापरुन बनावट दारू निर्मितीचा केला पर्दाफाश; 5 लाखांचा मुद्देमाल जप्त

यवतमाळ2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • गोधणी कोठा परिसरातील बनावट दारु कारखान्यावर पोलिसांची कारवाई; एका अल्पवयीन मुलासह चौघांना घेतले ताब्यात

शहरालगत असलेल्या गोधणी कोठा परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या एका बनावट देशी दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर अवधुतवाडी पोलिसांनी छापा मारला. ही कारवाई बुधवार, दि. १६ मार्च रोजी दुपारच्या सुमारास करण्यात आली. यावेळी स्पिरिट आणि इतर केमिकलचा वापर करुन बनावट देशी दारु तयार करीत असलेल्या चौघांना अटक करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी कारखाना चालविणारा सराईत गुन्हेगार भैय्या उर्फ दीपक यादव याच्यासह एका अल्पवयीन मुलासह चौघांना ताब्यात घेतले. इतकेच नव्हे तर चारचाकी, दुचाकी वाहनासह तब्बल पाच लाखांहून अधीक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गोधणी कोठा परिसरात बनावट देशी दारु तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती अवधुतवाडी पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून अवधुतवाडी पोलिस ठाण्याचे ठाणेदार मनोज केदारे यांनी त्यांच्या पथकासह सापळा रचून बनावट दारु तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा मारला. यावेळी स्पिरिट आणि इतर केमिकलचा वापर करुन बनावट देशी दारु तयार करीत असलेल्या चौघांना अटक करण्यात आली. भैय्या उर्फ दीपक यादव वय ३८ वर्ष रा. देवी नगर लोहारा, योगेश रेकलवार वय ३६ वर्षे रा. गोधणी कोठा, अंकु्श तीरमारे वय २० वर्षे रा. लोहारा अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे असुन त्यांच्यासह एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. या चौघांकडून कारवाई दरम्यान ६५० लिटर केमिकल, २० पेट्या देशी दारु, ३ ड्रम, १७५० देशी दारुच्या रिकाम्या बाटल्या, एक इंडिका कार, एक दुचाकी असा अंदाजे ५ लाख रुपयांपेक्षा अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अवधुतवाडी ठाणेदार मनोज केदारे, पोलिस उपनिरिक्षक दर्शन दिकोंडवार, नासीर शेख, सुधीर पुसदकर, यांच्यासह कर्मचाऱ्यांनी पार पाडली.

अशी केली जात होती बनावट दारूची निर्मिती : गोधणी भागात पोलिसांनी धाड टाकली तेव्हा असे लक्षात आले की, एका माठात स्पिरिट भरून ठेवले जात होते. त्यातून ते स्पिरिट चाळणीच्या साहाय्याने खाली काचेच्या बाटलीत भरले जात होते. त्याला दारूचा फ्लेवर यावा यासाठी केमिकल मिसळण्यात येत होते. कुठल्याही मशीन विना काचेच्या तुकड्याच्या साहाय्याने बाटलीच्या झाकणाला सील केले जात होते. या सर्व गैर कारभारामध्ये अल्पवयीन मुलाचा सुद्धा वापर करण्यात येत होता.

घराच्या पडीत शेडचा वापर
शहरातील गोधणी कोठा परिसरात एका घराचे बांधकाम करण्यासाठी लागणारे साहित्य ठेवण्यासाठी शेड बांधण्यात आले होते. त्या शेडचा वापर बनावट दारू कारखान्याकरीता करण्यात येत होता. या शेडमध्ये बनावट दारु तयार करुन ती विक्रीसाठी गावोगावी पाठविण्यात येत होती.

बातम्या आणखी आहेत...