आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजीवन प्राधिकरणाच्या वतीने शहरात करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्याची देयके मोठ्या प्रमाणात थकली आहे. या थकबाकीचा आकडा ४५ कोटींच्या वर पोहचला असल्याने ग्राहकांसाठी देयकांवरील व्याज पुर्णपणे माफ करणारी अभय योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेला येत्या ३० सप्टेंबर पर्यंत १ महिन्याची मुदतवाढ देण्यात आली असुन ग्राहकांना देयके भरण्याची आनखी एक संधी देण्यात आली असल्याचे जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगीतले आहे.
जीवन प्राधिकरणाच्या ग्राहकांकडे थकलेल्या ४५ कोटी रुपयांपेक्षा अधीकच्या थकबाकीमुळे जीवन प्राधिकरणाचे पुर्ण गणितच बिघडलेले आहे. पाणी देयकांची थकबाकी खुप जास्त वाढल्याने महिन्याला येणारे विजेचे देयकही अदा करने कठीण झाले असल्याचे जीवन प्राधीकरणकडुन सांगण्यात येत आहे. पैशांअभावी पाइपलाइन दुरुस्ती करणाऱ्या कंत्राटदारांची देयके ही रखडुन पडत असल्याने दुरुस्तीची कामे खोळंबली आहेत.
या सर्व बाबींमागे ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणात रखडलेली देयकांची थकबाकी आहे. जीवन प्राधिकरणाची थकबाकी आता चक्क ४५ कोटींच्या वर जावुन सध्या ४५ कोटी ७१ लाख ६३ हजार रुपयांवर पोहोचली आहे. ही थकबाकी वसूल व्हावी आणि ग्राहकांना देयकांवर लावण्यात आलेल्या व्याजाच्या रकमेपासून मुक्तता मिळावी यासाठी जीवन प्राधिकरणाच्या वतीने अभय योजना सुरू करण्यात आली होती. त्यात १०० टक्के व्याज माफ करण्यात येत आहे. या योजनेला आता ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याने ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जीवन प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.