आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबिर:शिबिरात 127 गरजू रुग्णांची नेत्र तपासणी; समदृष्टी क्षमता विकास व अनुसंधान मंडळ

यवतमाळएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

परिसरातील माधव चिकित्सालय मातोश्री वृद्धाश्रम निळोणा लगतच्या गोधणी बरवडा आणि चौधरा येथील गावकऱ्यांसाठी मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकंदर १२७ रुग्णांची नेत्रतपासणी करण्यात आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष सक्षमचे जिल्हाध्यक्ष सुशील कोठारी, नेत्र तपासणी तज्ज्ञ डॉ. स्वप्नील तायडे उपस्थित होते. शिबिरस्थळी चहापानाची व्यवस्था करण्यात आली. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी संस्कृती संवर्धक मंडळाचे सचिव सुनील खातखेडकर, सक्षमचे कार्यकर्ते राजा पारशेवार, जगदीश शर्मा, विजय कुंभलकर, कुळकर्णी, विजय लिलवे, अॅड. प्राची निलावार, दुर्गा खडसे, देवेंद्र देशपांडे, नितीन घोडे, निखिल अडकिने, नीलेश मुडे, अरविंद पट्टे, प्रदीप खराटे, अभय सरमुकद्दम, संतोष तायडे, मितेश हरसुले, प्रमोद मुत्तलवार यांनी परिश्रम घेतले. या शिबिरात तपासणी करण्यात आलेल्या ६० रुग्णांना अल्पदरात चष्मे तयार करुन देण्यात आले. सक्षमचे प्रांत सचिव संजय दंडे यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण कार्यक्रम पार पडला.