आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खून:कुऱ्हाडीने खून करुन रचला अपघाताचा बनाव ; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

यवतमाळ6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साडभावाने डोक्यावर कुऱ्हाडीने मारुन खून केला मात्र त्यानंतर प्रकरण अंगलट येण्याचे दिसताच स्वत:च मृतकास रुग्णालयात उपचारासाठी नेत अपघाताचा बनाव केला. मात्र पोलिसांना संशय आल्याने करण्यात आलेल्या उलट तपासात हा संपुर्ण प्रकार उघडकीस आला. ही घटना मंगळवार दि. २२ नोव्हेंबर रोजी घडली.

ज्ञानेश्वर भीमराव बरगे वय ५५ वर्षे रा. बरगेवाडी घोनसारा असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी सविस्तर असे की, हर्षी या गावावरून ज्ञानेश्वर बरगे या व्यक्तीचा मृतदेह पुसद येथील ग्रामीण रुग्णालयात आले असल्याची माहिती पुसद शहर पोलिसांनी पोफाळी पोलिसांना दिली. त्यात त्यांनी मृतदेहाची पाहणी केली असता त्याच्या डोक्यावर मारहाणीच्या जखमा दिसुन आल्या. त्यावरुन त्यांना हे प्रकरण घातपाताचे असल्याचा संशय आल्याने त्यांनी पोफाळी पोलिसांना तातडीने येवुन पाहणी करावी असे सांगितले. त्यावरुन पोफाळी ठाणेदार राजीव हाके त्यांच्या पथकासह पुसद रुग्णालयात दाखल झाले. मात्र तोपर्यंत त्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन देखील करण्यात आला होता. त्यामुळे पोफाळी पोलिसांनी पोलिस उपनिरिक्षक लोहकरे यांनी मृताच्या डोक्यावर असलेल्या जखमांचे काढलेले फोटो पाहीले असता त्या जखमा कुठल्यातरी धारदार शस्त्राच्या असल्याचा संशय त्यांना आला.

दरम्यान पोफाळी पोलिसांनी मृताच्या नातेवाइकांची चौकशी केली. त्यात त्यांनीसुद्धा या घटनेसंदर्भात काहीही माहिती नसल्याचे सांगितले. मात्र जखमांचे फोटो, शरीरावरील जखमांचे स्थान, वैद्यकीय तपासणीच्या नोट्स मधील जखमांचा उल्लेख, दिलेले मृत्यूचे कारण, वैद्यकीय अधिकारी आणि मताचे नातेवाइक यांची केलेली चौकशी या सर्व कारणावरून संशय बळावल्याने ठाणेदार राजीव हाके यांनी स्वत: फिर्यादी होत अनोळखी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर सर्वांच्या जबाबामध्ये विसंगती आढळत असल्याने आणि मृताचा साडभाऊ गजानन मारोती मुकाडे वय ४० वर्षे रा. हर्षी याने उडावा-उडवीची उत्तरे दिल्याने त्याच्यावर संशयाची सुई येवुन स्थिरावरली. त्यामुळे मारोती मुकाडे याची कसुन चौकशी केली असता त्याने मृत ज्ञानेश्वर याच्या डोक्यावर कुऱ्हाडीने मारुन त्याचा खुन केला आणि त्यानंतर स्वत:चा बचाव करण्यासाठी त्याला रुग्णालयात नेले व या प्रकरणाला एखादा अपघात दर्शविण्याचा प्रयत्न केला अशी कबुली पोलिसांना दिली. मात्र खुनाचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

बातम्या आणखी आहेत...