आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील नरसाळा येथील शेतकऱ्याने नापिकीला कंटाळून विषारी कीटकनाशक प्राशन करून स्वतःचे जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना बुधवार, २१ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. रामदास केशवराव ठाकरे (५८), रा. नरसाळा, असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार, मृत शेतकरी रामदास ठाकरे मंगळवारी काही कामासाठी बाहेर गावी जातो म्हणून घरातून बाहेर पडले होते.
मात्र, रात्री उशीरापर्यंत घरी परतले नाही. शेवटी बुधवारी काही व्यक्ती कापूस वेचणीकरिता सकाळच्या सुमारास शेताकडे गेले होते. त्यावेळी शेतकरी रामदास ठाकरे स्वतःच्या शेतात कीटकनाशक प्राशन करून मृतावस्थेत पडून असल्याचे कुटुंबातील सदस्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी लगेच घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना दिली. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला. तद्नंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव येथे पाठवण्यात आला असून, त्यांच्या नावाने नरसाळा येथे अल्प शेती आहे. यावर्षी अतिवृष्टी आणि मागील काही वर्षांपासून होत असलेली नापिकीमुळे त्यांना कर्जाच्या खाईत लोटलेले होते.
तालुक्यात होत असलेल्या आत्महत्येमुळे तालुका हादरला असून, तालुक्यात आत्महत्या थांबविण्यासाठी जनजागरण करण्याची गरज आहे. रामदास यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा नातवंड, असा आप्त परिवार आहे. पुढील तपास ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली जामदार आनंद अचलवार करत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.