आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळ:सावरगड येथे शेतकरी विकास आघाडीचा दणदणीत विजय

यवतमाळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील सावरगड येथे ३ एप्रिल रोजी झालेल्या आदिवासी विविध कार्यकारी सोसायटी निवडणुकीत शेतकरी विकास आघाडीच्या सर्वच १३ सदस्यांनी मोठ्या फरकाने दणदणीत विजय मिळवला.

यवतमाळ तालुक्यातील सर्वांच्या नजरा लागलेल्या आदिवासी विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत जि. प. माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रवी ढोक, हरिद्वार खडके यांच्या समर्थकांचे एक पॅनल होते. यांच्यात एकतर्फी झालेल्या निवडणुकीत शेतकरी विकास आघाडीच्या पॅनलने मोठ्या मताधिक्याने विजय संपादित केला. निवडणूक निकाल जाहीर होताच समर्थकांनी जल्लोष केला.

विजयी उमेदवारांमध्ये हरिद्वार खडके, दादाराव मेटकर, रमेश सरगर, संजय भेंडारकर, संजय घोडे, शंकर नागमोते, रामराम फुपरे, बाळकृष्ण वाढवे, मनोज दर्डा, शाम मेंढे, सुनील देवकर, वंदना आखर, सुलोचना वाघमारे यांचा समावेश आहे. पॅनलच्या विजयासाठी पंचायत समिती माजी सदस्य सुनील कांबळे, सुहास सरगर, विरू दर्डा, कैलास फुपरे, संतोष राऊत, गणपत साखरकर, मुकिंद मेंढे यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...