आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरीप हंगामातील माती परीक्षण:यवतमाळच्या कृषि विज्ञान केंद्रात प्रो सॉइलच्या वतीने शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम.

यवतमाळ6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृषी विज्ञान केंद्र व ॲफ्रो, यवतमाळ आणि प्रो सॉईल प्रकल्प, मॅनेज, हैद्राबाद यांचे विद्यमाने कृषी विज्ञान केंद्र येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यक्रम समन्वयक डॉ. सुरेश नेमाडे, डॉ. संजय काकडे, डॉ. भगवान सोनवणे, डॉ. पी. यू. घाटोळे, प्रभारी ॲटिक सेंटर, डॉ. आर. एस. वानखेडे, डॉ. मिलिंद साबळे, व्ही. एस. ठोकरे, गजेंद्र चवळे, अमीत बोरकर उपस्थित होते. तसेच कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. सुकेशनी वाणे, डॉ. प्रमोद मगर, मयूर ढोले, स्नेहलता भागवत, उपस्थित होते.

डॉ. सुरेश नेमाडे यांनी प्रोसॉईलप्रकल्प अंतर्गत संभाव्य वातावरण बदलानुरूप व सध्या परिस्थितीनुसार तज्ज्ञाकडून वेळोवेळी सल्ल्यानुसार मार्गदर्शन केले जाते. तरी या प्रणालीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले. प्रास्ताविक अमीत बोरकर राबवत असलेल्या प्रो सॉईल प्रकल्पाचे महत्त्व व उद्देश विषद केले. कार्यक्रमाच्या तांत्रिक सत्रामध्ये डॉ. संजय काकडे, सहयोगी प्राध्यापक, कापूस संशोधन केंद्र, अकोला यांनी खरीप हंगामातील माती परीक्षण आधारित खत व्यवस्थापन या विषयी मार्गदर्शन केले.

डॉ. भगवान सोनवणे यांनी पिकाचे उत्पादन वाढीसाठी सेंद्रिय खतांचे महत्त्व व पिकांची फेरपालट या विषयी मनोगत व्यक्त केले. डॉ. प्रमोद मगर यांनी कापूस पिकातील कमी खर्चिक खरीप हंगामातील कीड व रोग व्यवस्थापन तर डॉ. मिलिंद साबळे यांनी ॲफ्रो प्रकल्पांतर्गत उपक्रमाचा उहापोह केला. कार्यक्रमाकरिता कृषी विज्ञान केंद्र व ॲफ्रो प्रकल्पाचे अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. संचालन शास्त्रज्ञ मयूर ढोले तर आभार प्रदर्शन विशाल राठोड यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...