आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाच मागितली जात असल्याची शेतकऱ्यांची तक्रार:सर्वेक्षण यादी अनियमितता होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

मानोरा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अतीवृष्टीमुळे यंदा तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शासनाच्या निर्देशानंतर तालुक्यातील विविध गावांमध्ये झालेल्या पिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्यास सुरूवात झाली आहे. मात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या यादीत नाव टाकण्यासाठी फुलउमरी, सोमेश्वरनगर, गोस्ता या गावांमध्ये शेतकऱ्यांकडून पैसे मागितले जात असल्याची बाब समोर आली आहे.

यावर्षी पावसामुळे शेतकऱ्यांचे शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत ७२ तासांच्या आत ऑनलाइन तक्रार नोंदवली त्यांच्या शेतातील नुकसानीचा विमा प्रतिनिधींकडून आढावा घेतला जात आहे. मात्र नुकसानग्रस्तांच्या यादीत नाव टाकण्यासाठी विमा प्रतिनिधी शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करत असल्याची बाब समोर आली आहे. कृषी अधिकाऱ्यांनी वेळीच दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करत शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे.

बातम्या आणखी आहेत...