आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आय विल केअर’:मानसिक आरोग्य तपासून शेतकरी व गरजूंनीही समुपदेशनाचा लाभ घ्यावा; मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे आवाहन

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अधिकारी व कर्मचारी यांचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी प्रशासनाद्वारे ‘आय विल केअर’ हे ऑनलाइन अप्लिकेशन सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शेतकरी व नागरिक यांनी देखील या विनामुल्य सेवेचा लाभ घ्यावा व आपले मानसिक आरोग्य तपासून तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे समुपदेशन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवत असतात. आपल्या आयुष्यात येणाऱ्या विविध प्रसंगांना समर्थपणे समोर जाणे प्रत्येकाला जमत नाही किंवा त्यावर समाधानकारक मार्ग सापडत नाही. जसं शारीरिक दुखणे असते, तसेच मनाचेही दुखणे असू शकते. पण मनाचे दुखणे दिसत नाही आणि पटकन लक्षातही येत नाही. मानसिक आरोग्य म्हणजे आयुष्यात येणाऱ्या सगळ्या भावनांना खंबीरपणे सामोरे जाणे, कुटुंबातील आणि समाजातील इतर लोकांशी चांगले नाते असणे असा अर्थ आहे. एखाद्या तज्ञ मानसशास्त्रीय सल्लागाराची मदत घेतली तर मनावरचा ताण कमी होऊन समस्येवर निश्चितपणे तोडगा काढता येऊ शकतो.

मात्र या संदर्भात अशी जागरूकता नाही उलट अनेक गैरसमज लोकांमध्ये आढळतात. मनोविकार तज्ज्ञाकडे जाणे ही सामाजिक प्रतिष्ठेआड येणारी बाब समजली जाते. शारीरिक आजाराप्रमाणे मानसिक आजारांवर देखील तात्काळ औषधोपचार मिळवणे आवश्यक असते. मानसिक आरोग्याचे आणि आजारांवरील औषधोपचाराचे महत्व लक्षात घेता यवतमाळ जिल्ह्यात विविध विभागात काम करणारे अधिकारी तथा कर्मचारी, शेतकरी व नागरिकांकरीता आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई तथा ई-सायक्लिनिक नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने “आय विल केअर हे ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे. यवतमाळमध्ये हा उपक्रम पायलट प्रोजेक्ट म्हणून राबवण्यात येत आहे.

कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये कामाचा ताण कमी करण्याकरिता सुप्रसिद्ध संमोहन तज्ञ व प्रेरक वक्ता नवनाथ गायकवाड यांचे व्याख्यानाचे आयोजन बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे करण्यात आले होते. सदर कार्यक्रमामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ, उपविभागीय अधिकारी कार्यालय यवतमाळ, तहसील कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये असलेले इतर कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व अधिकारी तथा कर्मचारी यांनी आय विल केअर च्या माध्यमातून आपले मानसिक स्थिती तपासावी व आवश्यक असल्यास उपलब्ध समुपदेशनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन येडगे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...