आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधान्याचे उत्पादन करणारा शेतकरीच शासनाकडून होणाऱ्या स्वस्त गव्हापासून वंचित असल्याचे समोर आले आहे. एपीएल रेशन कार्डधारक शेतकऱ्यांना दोन महिन्यांपासून सवलतीच्या दरात करण्यात येत असलेल्या गव्हाचे वितरण बंद झाले आहे. शेतकऱ्यांना गव्हाचा पुरवठा करता यावा, यासाठी पुरवठा विभागाने भारतीय खाद्य निगमकडे मागणी केली आहेत. मात्र आवकच नसल्याने गव्हाचा पुरवठा होत नसून, शेतकऱ्यांना केवळ तांदळाचेच वितरण करण्यात येत आहे.
दुष्काळात शेतकऱ्यांना अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट करण्यात आले. त्यानंतर तीन रुपये किलो तांदूळ व दोन रुपये किलो गहू या दराने कुटुंबाला दरमहा २५ किलो धान्याचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला. ८८,२९८ शेतकरी कुटुंबांतील ३ लाख ५९,४४६ शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत आहे. आत्महत्या थांबावी यासाठी योजना सुरु केल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळला, परंतु असे असले तरी दोन महिन्यापासून गव्हाचे वाटप बंद आहे.
गव्हाचा पुरवठा नाही
दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांसाठी गव्हाचा पुरवठा होत नाही. लाभार्थ्यांना गव्हाचे वाटप रखडले असून त्यांना तांदळाचे वाटप करण्यात येत आहे. गव्हाचा पुरवठ्यासाठी पुरवठा विभागाकडून एफसीआयकडे मागणी केली आहेत.
सुधाकर पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी
फेऱ्या मारून काही उपयोग नाहीच
शेतकऱ्यांसाठी शासन स्तरावरून गव्हाचा पुरवठा होत नसल्याने ते मे, जून महिन्यापासून गव्हासाठी रेशन दुकानाच्या चकरा मारत आहे. त्यातच जुलै महिना संपायला एक आठवडा शिल्लक असल्याने या महिन्यासाठी ही अद्याप गहू उपलब्ध झाला नाही. त्यामुळे जगाच्या पोशिंद्यालाच गव्हापासून वंचित राहावे लागत आहे.
तालुकानिहाय लाभार्थी संख्या
तालुका लाभार्थी
आर्णी ६८३१ २५८३६
बाभुळगाव २४२१ ९५२६
दारव्हा ९१५८ ३६२०२
दिग्रस ६८७४ २८९८८
घाटंजी १००२ ३९०५
कळंब ३५३८ १३४९५
केळापूर २७९४ १०३०५
महागाव ५७३६ २४३८०
मारेगाव ३४५१ १२३८२
नेर ५७०९ २३०९४
पुसद ८८९६ ३८८५८
राळेगाव ४५३१ १८२८१
उमरखेड ११८६७ ५२१०५
वणी ६६८४ २७७५८
यवतमाळ ६५७७ २६४४७
झरी जामणी २२९ ७८८४
एकूण ८८२९८ ३५९५४६
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.