आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू

कळंबएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील मेंढला येथील शेतकरी रामराव गोविंदराव खडसे वय ५५ वर्ष यांना दि.२ नोव्हेंबर रोजी मेंढला शिवारात असलेल्या शेतामध्ये सकाळच्या दरम्यान सिंचन करण्यासाठी गेले असता विद्युत शाॅक लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घडली.कळंब तालुक्यातील शेतकरी कपाशीच्या,तुरीच्या झाडांना पाणी ओलित करीत आहे तर बरेच शेतकरी रब्बी हंगामातील गहू,हरभरा पिकांसाठी कठाण करीत आहेत.

अशाच प्रकारे कळंब तालुक्यातील मेंढला येथील शेतकरी रामराव गोविंदराव खडसे यांचे मेंढला गावाला लागूनच असलेल्या शेतात स्प्रिंकलर ने कपाशी पिकाला पाणी ओलित करणे सुरू असताना अचानक त्यांना विद्युत करंट लागल्याने जागीच ठार झाले. वीज वितरण कंपनीला गावकऱ्यांनी सदर घटनेची माहिती कळवल्याने वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटना स्थळाचा पंचनामा करुन पोलीस कर्मचाऱ्यांनी यवतमाळ शासकीय रुग्णालयात प्रेत नेले होते.मृतक शेतकऱ्याचे मागे पत्नी,मुलगा,मुली असा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...