आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:सिंचनापासून वंचित शेतकऱ्यांची  जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरसगाव लघु सिंचन प्रकल्पावरील कालव्याच्या सिंचनापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी वीस वर्षापासून कालव्याच्या पाण्यापासून वंचित असल्याने न्याय मिळवून देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली. सावरगाव काळे, गोळेगाव, खानापूर येथील शेतकरी गेल्या २० वर्षापासून शिरसगाव लघु सिंचन प्रकल्पाच्या पाण्यापासून वंचित आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अनेकदा तक्रारी दिल्यात मात्र त्यांना न्याय मिळाला नाही. या धरणात १०० टक्के पाणीसाठा असून सुध्दा कालव्याचे पाणी वाटपात नियोजन नाही.

त्यामूळे पाण्याचा अपव्यय नदी, नाल्यात होत आहे. या बाबत पाटबंधारे विभागाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला मात्र, त्यांच्याकडून कोणतेही नियोजन करण्यात आले नाही. अखेर सोमवारी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत याबाबत नविेदन दिले. यावेळी प्रहार जिल्हाप्रमुख नितीन मिर्झापूरे, गोपाल काकडे, यांच्यासह सावरगाव काळे येथील शेतकरी सतीश काळे, महेश काळे, संदीप कोल्हे, अमित लाड, शेतकरी उपस्थित होते.

विमा कंपनीच्या चुकांमुळे शेतकरी सापडले आर्थिक अडचणीत पंतप्रधान पिक विमा खरीप हंगाम २०२२-२३ ची रक्कम शेतकऱ्यांना अल्प मिळाली. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले असून ही अल्प रक्कम पिक विमा कंपनीच्या चुकीच्या धोरणामुळे मिळाल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देवून नविेदन दिले. यावेळी आलोडा येथील शेतकरी रामराव काकडे, अरूण ओंकार, श्रीराम काकडे, नरेंद्र काल्हे, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...