आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीकविमा:तीन लाख 99 हजारांवर शेतकऱ्यांनी काढला पीकविमा

यवतमाळ11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत अर्ज दाखल करण्यासाठी मिळालेल्या एक दिवसाच्या मुदत वाढीत ४४ हजार ६६७ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. सोमवार, दि. एक ऑगस्ट शेवटच्या दिवसांपर्यंत तीन लाख ९९ हजार २७६ शेतकऱ्यांनी विमा काढला असून, तीन लाख एक हजार ४६८ हेक्टरवरील पिके संरक्षित झाले आहे. गतवर्षी पेक्षा यंदा ४७ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी विमा भरला.

प्रधानमंत्री पीक विमा योजना सन २०२२-२३ मध्ये कार्यान्वित करण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून खरीप ज्वारी, सोयाबीन, मुग, उडीद, तूर, कापूस आदी पिकांचा विमा काढता येणार होता. पिक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत उत्पादनात येणारी घट, पिक पेरणी, लावणीपूर्व नुकसान भरपाई निश्चित करणे, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत नुकसान भरपाई, काढणी पश्चात नुकसान, स्थानिक नैसर्गीक आपत्ती आदी बाबींचा समावेश आहे. त्या अनुषंगाने विमा काढण्यास शेतकऱ्यांची गर्दी सुरू होती. अशात शेतकऱ्यांची गैरसोय टळावी ह्याकरीता सीएससी सेंटरवर विमा काढण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

वीमा काढण्यासाठी ३१ जुलैपर्यंत होती. तो पर्यंत तीन लाख ५४ हजार ६०९ शेतकऱ्यांनी विमा काढला होता. मात्र, शेवटच्या दिवशी रविवार सुट्टी असल्यामुळे एक दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. सोमवार, दि. एक ऑगस्ट शेवटच्या दिवशी ४४ हजार ६६७ शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केल्याने तीन लाख ९९ हजार २७६ वर यंदा आकडा पोहचला. एकूण तीन लाख एक हजार ४६८ हेक्टरवरील पिके संरक्षित झाले आहे. यामध्ये सीएससी सेंटरवर ३ लाख ५५ हजार ६६०, बँकेत ४२ लाख १६१, आणि एक हजार ४५५ शेतकऱ्यांनी स्वत:, असे मिळून ३ लाख ९९ हजार २७६ शेतकऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये ३७४ कोटी ९९ लाख ९६ हजार ६९३ रूपये शेतकऱ्यांचा हिस्सा आहे. गतवर्षी पेक्षा यंदा ४७ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी विमा काढला.

नव्या कंपनीचा दिलासा मिळणार का?
गतवर्षी विमा कंपनीच्या अडेलतट्टू धोरणामुळे बहुतांश शेतकऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या होत्या. यंदा मात्र, शासनाने कंपनी बदलली असून, यंदा अडचणी येणार नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्या अनुषंगाने प्रशासन आणि विमा कंपनीसुद्धा काळजी घेत असल्याचेही सांगण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...