आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाळी दौलत खान येथे स्व. सुधाकरराव नाईक जल सागर धरण क्षेत्राच्या परिसरातील सातत्याने रोहित्र जळत आहे. सिंचनाअभावी शेतातील उभे पीक आडवे पडत आहे. शेत शिवारात टरबूज, ज्वारी, मका, भुईमूंग, ऊस करपून गेल्याने शेतकरी हतबल झाले. महागाव कार्यालयाच्या वारंवार चकरा मारून त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी शेवटी पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी बुधवार, दि. ६ एप्रिल रोजी पुसद उपविभागीय कार्यकारी अभियंत्याकडे धाव घेतली. रोहित्र तातडीने बसवून द्यावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे.
मागील १५ दिवसात काळी दौ. येथील स्व सुधाकरराव नाईक धरण क्षेत्रातील ६३ केव्हीची डीपी जळालेली आहे. सतत तीन वेळा विज वितरण कंपनीने रोहित्र बसविले. परंतु तिनही वेळा बसवलेल्या रोहित्र तांत्रिक रित्या नादुरुस्त झाल्याने पुन्हा जळून गेले आहे.
त्यामुळे शेतातील उभे पीक करपून गेले. शेतकरी प्रचंड नैराश्यात आला आहे. तेथील ६३ केव्हीएच्या ऐवजी १०० केव्हीएच्या कार्यक्षमतेचे ट्रांसफार्मर बसवण्यात यावे ही मागणी घेऊन बुधवार, दि. ६ एप्रिल रोजी निवेदनाच्या माध्यमातून उपविभागीय कार्यकारी अभियंता एस. आडे यांच्या कार्यालयावर शेतकऱ्यांनी धडक दिली. दोन दिवसांत रोहित्र ट्रांसफार्मर बसविण्यात आले नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांनी सन २०१९ पासून अनामत रकमेसह कोटेशन घेतलेले आहे. त्यांना तातडीने वीजजोडणी देण्यात यावी, अशी मागणी केली. ट्रांसफार्मर बसवून देण्याचे आश्वासन उपविभागीय कार्यकारी अभियंता एस. एस. आडे, महागावचे कार्यकारी अभियंता चव्हाण यांनी दिले.
यावेळी मनिष जाधव, वसंता आढाव, संदेश कुलदिपके, प्रसाद राठोड, गजानन आढाव, संजय टेमकर, उत्तम राठोड, प्रवीण टेमकर, सुधाकर टेमकर, धेमसिंग जाधव, बधुसिंग जाधव, अरूण कुलदिपके, नंदाबाई टेमकर, किसन आढाव, प्रसाद राठोड, गजानन चिद्दरवार, पुंडलिक आढाव, परसराम आढाव, आदीनाथ चव्हाण, अरूण जाधव आदी होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.