आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी‎ हवालदिल:घाटंजी येथे आज होणार‎ शेतकरी ठिय्या आंदोलन‎

घाटंजी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्याची शेतमालाची‎ परिस्थिती बघता कापसाला गेल्या‎ वर्षीच्या तुलनेत फारच कमी भाव‎ आहे. अशीच परिस्थिती इतरही‎ शेतमालाची आहे. यामुळे शेतकरी‎ हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांच्या‎ या प्रश्नाला घेऊन घाटंजी येथे एक‎ दिवसीय शेतकरी ठिय्या आंदोलन दि.‎ ७ फेब्रुवारीला आयोजित केले आहे.‎ या आंदोलनाचे नेतृत्व महेश पवार‎ सामाजिक कार्यकर्ते आणि रितेश‎ बोबडे युवा कार्यकर्ते हे करणार असून‎ या कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या विविध‎ मागण्या मांडण्यात येणार आहे.‎ या आंदोलनाला सकाळी ११‎ वाजता तहसील कार्यालय‎ घाटंजीच्या पुढे सुरू होईल.

यामध्ये‎ विविध शेतकरी नेते आपली‎ भूमिका मांडणार आहे. या‎ आंदोलनाच्या प्रमुख मागण्या,‎ कापूस तूर सोयाबीनला योग्य भाव‎ द्यावा, कापूस सोयाबीन निर्यात‎ खुली करावी, कापूस व इतर‎ शेतमालाच्या आयातीवर निर्बंध‎ ठेवावा, कृषी पंपाला दिवसा वीज‎ देण्यात यावी, जंगली‎ जनावरापासून शेतीला संरक्षण‎ मिळावे, उर्वरित पीक विमा वाटप‎ करण्यात यावा तसेच सरसकट‎ देण्यात यावा, तांत्रिक बाबीमुळे‎ राहिलेल्यांना कर्जमाफी देण्यात‎ यावी, पी एम किसान योजनेपासून‎ वंचित शेतकऱ्यांना लाभ मिळावा,‎ इत्यादी मागण्या या आंदोलनात‎ असणार आहे. या आंदोलनात‎ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी‎ सहभागी व्हावे असे आवाहन‎ भूमिपुत्र संघर्ष समितीतर्फे महेश‎ पवार, रितेश बोबडे यांनी केलेले‎ आहे.‎

बातम्या आणखी आहेत...