आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:बोरी येथे बियाणे प्रकाराबद्दल शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन

दारव्हा7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला सलग्नित नवसंजीवन शिक्षक प्रसारक मंडळ दारव्हाद्वारा संचालित कृषी महाविद्यालय दारव्हा ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम वर्ष २०२२-२३” अंतर्गत कृषिदूत समीक्षा पडलवार, जयश्री पुसदकर, प्राची राणे, दिक्षिता पवार यांनी बोरी येथे बियाण्यांच्या प्रकाराबद्दल शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशातून हा उपक्रम राबविण्यात आला.

कृषीदूतांनी मुलभूत बियाणे, पैदासकर बीज उत्पादन, प्रमाणित बीज उत्पादन, सत्यप्रत बीज उत्पादन या बियाण्यांचा प्रकारा बद्दल माहिती दिली. त्या सोबतच त्यांचे टॅग, लेबल तसेच त्यांची भौतिक शुद्धता, आनुवंशिक शुद्धता, वाण, परीक्षण व पॅकिंग तारीख, आर्द्रता, प्रत्यक्ष वजन, बीज उगवण क्षमता या बद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

सोबतच काळानुसार शेतीमध्ये होणारे बदल आणि त्यामुळे एकूण शेती उत्पादनावर होणारा परिणाम आणि त्यासाठी बीज उत्पादन तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी कसे फायद्याचे आहे याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमावेळी सरपंच लक्ष्मण वांजरेकर, उपसरपंच ओम लढ्ढा, शैलेश काकडे, अनिकेत बेलगमवार, दिलीप काकडे, अनंत लांडगे आदी शेतकरी उपस्थित होते. यासाठी विद्यार्थ्यांना प्राचार्य पी. ए. खाडे, वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रा. व्ही. जी. गुल्हाने, कार्यक्रम अधिकारी प्रा. व्ही. यू. देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.

बातम्या आणखी आहेत...