आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाईक कृषी गौरव पुरस्कार:वसंतराव नाईक स्मृतीदिनी होणार शेतकऱ्यांचा गौरव

पुसद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्या स्मृतीदिना निमित्त दि. १८ ऑगस्टला वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार दुपारी १२.१५ वाजता प्रदान समारंभ येथील बा. ना. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सुधाकरराव नाईक प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आला आहे. माजी आरोग्य मंत्री आ. राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन हवामान अभ्यासक पंजाबराव डक हे राहणार आहेत. अविस्मरणीय कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृषिभूषण दीपक आसेगावकर यांनी दि. ४ रोजी झालेल्या सुधाकरराव नाईक प्रेक्षागृहात घेतलेल्या बैठकीमध्ये केले.पत्रकार परिषद प्रसंगी प्रतिष्ठानचे सचिव तथा माजी प्राचार्य डॉ. उत्तम रुद्रावार, प्रा. गोविंद फुके, सीराज हिराणी व मोहिनी इंद्रनील नाईक ह्या उपस्थित होत्या. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विविध समित्यांचे गठीत करण्यात आल्या असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.

सर्व संयोजकांच्या समित्यांनी कामकाज करावे असे आवाहन दीपक आसेगावकर यांनी केले. याप्रसंगी मोहिनी नाईक यांनी मार्गदर्शन केले. मागील ४२ वर्षापासुन माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृतिदिनानिमित्त शेतकऱ्यांचा गौरव करण्यात येतो. ही अभिमानाची बाब असल्याचे त्या म्हणाल्या. प्राचार्य डॉ. उत्तम रुद्रावार यांनी मनोगत व्यक्त करत मार्गदर्शन केले.ते म्हाणाले कि, वसंतराव नाईक प्रतिष्ठानतर्फे मागील ४२ वर्षापासून हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. आता सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल होत आहे. शेतकऱ्यांचा दि.१८ ऑगस्ट रोजी गौरव केला जातो.आजवर जवळपास ४०० हुन अधिक शेतकरी व कृषी शास्त्रज्ञांचे मौलीक मार्गदर्शन मिळाले.

मागील ४० वर्षामध्ये महाराष्ट्रातील शंभर मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. शेतकऱ्यांचे कैवारी म्हणुन कै. वसंतराव नाईक यांचे कार्य मोलाचे आहे असे प्राचार्य डॉ. उत्तम रुद्रावार म्हणाले.प्रतिष्ठाणचे अध्यक्ष दीपक आसेगावकर यांनी दि‌. १८ ऑगस्ट २०२२ रोजी होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली.कार्यक्रमात दु. ३.१५ वाजता डॉ. जितेंद्र कदम यांचे हळद पिकावर मार्गदर्शन होणार आहे.त्याचबरोबर सत्कारमूर्ती कृषी शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन व सत्कारमूर्ती शेतकऱ्यांचे अनुभव कथन होणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी व संयोजकांशी बोलताना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...