आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभरधाव येत असलेल्या टँकर व ट्रेलरची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात टँकर चालकाचा जागीच मृत्यू झाला तर ट्रेलर चालक गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवार, २ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास वणी वरोरा मार्गावरील नायगाव जवळ घडली. मौला अली मेहमूद शेख वय ४५ वर्ष रा. जळकोट ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद असे या अपघातात ठार झालेल्या टँकर चालकाचे नाव आहे. वणी वरोरा मार्गाचे चौपदरी करणाचे काम जवळजवळ पूर्ण झाले असून वर्धा नदी वरील पुलाचे बांधकाम सुरू असल्याने मांजरी फाट्यापर्यंत एकेरी वाहतूक सुरू आहे.
याच ठिकाणी सुसाट वेगात असलेले हे दोन्ही ट्रक एकमेकांना साइड देण्यात चुकल्याने समोरासमोर धडकले. केमिकल भरलेला बारा चाकी टँकर टीएस ३० टीए २२२६ वणी मार्गे चंद्रपूरकडे जात होता. तर ट्रेलर एमएच ४० सीडी ४९०१ हा वरोरा मार्गे वणीकडे येत होता. दरम्यान, वणी वरोरा मार्गावरील नायगाव जवळील पेट्रोलपंप जवळ दोन्ही ट्रक समोरासमोर धडकले.
यात टँकरचा चालक ट्रेलरच्या चाकाखाली चिरडल्या गेल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर ट्रेलर चालकाच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाल्याने त्याला घटनास्थळावरून तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आहे. अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णालयात पाठवला. टँकरचा मागील टायर पंक्चर झाल्याने चालक हा चालत्या ट्रक मधून डोकावून पाहत असताना ट्रेलर व टँकर समोरासमोर धडकले. त्यामुळे टँकर चालक हा अक्षरशः चिरडला गेला. जखमीला घटनास्थळावरूनच रुग्णालयात हलवण्यात आल्याने त्याचे नाव कळू शकले नाही. अपघात एवढा भीषण होता की, ट्रेलरची केबिन पूर्णतः चकणाचुर झाली. तर टँकर रस्त्याच्या कडेला जाऊन खोलगट भागात उलटला. या प्रकरणाचा पुढील तपास वणी पोलिस करत आहे.
भरधाव दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी थेट रस्त्याच्याकडेला असलेल्या झाडावर जावून आदळली. या अपघातात दुचाकीस्वाराचा गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेवून जखमीला रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना पांढरी गावाजवळ दि. १ फेब्रुवारीला दुपारच्या सुमारास घडली. शुभम अनंता उमरे वय २५ वर्ष रा. कुऱ्हाड ता. घाटंजी असे मृत दुचाकीस्वाराने नाव आहे. या प्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.