आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण अपघात:फुलसावंगी येथे कारचा भीषण अपघात

फुलसावंगीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

फुलसावंगी-महागाव मार्गावर कारचा भीषण अपघात झाला असून या अपघातात दोघे जण जखमी झाले आहे. तरुण समद नवाब व समीर शेख अशी जखमींची नावे आहे.उमरखेड येथून फुल सावंगी येथील आठवडी बाजारात नातेवाईकांना भेटण्यासाठी येत असलेली कार क्रमांक एमएच-४८-पी-६८३४ या वाहना समोर कुत्रा आल्याने त्याला वाचविण्याच्या बेतात चालकाचे वाहना वरील नियंत्रण सुटले व कार समोरील झाडावर जाऊन आढळली.

ही टक्कर इतकी जबरदस्त होती की कार चा अक्षरशः चुराडा झाला. मात्र सुदैवाने गाडीमध्ये असलेल्या ना गंभीर इजा झाली नाही व थोडक्यात जीवित हानी टळली. या अपघातात नांदेड येथील चालक तरुण समद नवाब व समीर शेख हे किरकोळ जखमी झाले आहेत.घटनेची माहिती मिळताच महागाव ठाणेदार विलास चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक राहुल वानखेडे, बिट आमलदार नीलेश पेंढारकर, मोहन बिहाडे, पोलिस आमलदार बालाजी मार्कड यांनी भेट दिली. बातमी लिहीपर्यत पंचनामा सुरू होता.

बातम्या आणखी आहेत...