आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:एका क्लिकवर कळणार खतांची माहिती; कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी तयार केले ब्लॉग

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खरीप हंगाम आता एक महिन्यांवर आला आहे. या हंगामात शेतकऱ्यांना खतांचा तुटवडा भासू नये व कुणी कृत्रिम टंचाई निर्माण करून लूट करू नये यासाठी कृषी विभागाने आता एका क्लिकवर खतासाठ्याची माहिती उपलब्ध करून दिली आहे.

शेतकऱ्यांना खत टंचाईला सामोरे जावे लागत आहे. दुकानदार खते उपलब्ध नसल्याचे सांगतो आणि शेतकऱ्यांना पुन्हा पायपीट करावी लागते. खतांची खरच टंचाई आहे का? कोणती खते उपलब्ध आहेत? याची माहिती शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे त्यांची पिळवणूक होते. परंतु आता जिल्ह्यात तसेच जवळच्या दुकानात कोणती आणि किती प्रमाणात खते उपलब्ध आहेत याची माहितीसाठी कृषी विभागाने ब्लॉग तयार केला.

खताची माहिती थेट आपल्या संगणक किंवा मोबाइलमधून मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना या ब्लॉगचा फायदा होणार आहे. खरीप हंगाम हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण हंगाम असतो. या हंगामात बियाणे आणि खतांचा तुटवडा भासू नये यासाठी कृषी विभाग प्रयत्न करत असतो. त्यात रशिया आणि युक्रेन या दोन देशांमधील युद्धजन्य स्थितीमुळे यंदा खताचा तुटवडा भासू शकतो असा अंदाज यापूर्वीच कृषी विभागाने व्यक्त केला होता. खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करून कृषी दुकानदारांकडून शेतकऱ्यांची लूट होऊ नये यासाठी कृषी विभागाने खतांच्या साठ्याची माहिती रोज ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.

बातम्या आणखी आहेत...