आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापोलिस दलात चालक शिपाई पदासाठी २ जानेवारीपासून भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. नवीन पोलिस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर ही भरती प्रक्रिया राबवली जात असून, या पदाच्या १४ जागांसाठी तब्बल १ हजार ७८ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. २ जानेवारी रो जी २०० उमेदवारांना प्रवेशपत्रे देऊन मैदानी चाचणीसाठी बोलावण्यात आले होते. त्यापैकी १४४ उमेदवार हजर राहिले, तर ५६ उमेदवार गैरहजर राहिले. हजर राहिलेल्यांपैकी ३४ उमेदवार अपात्र ठरले.
पहिल्या दिवशी ११० उमेदवार शारीरिक चाचणीस पात्र ठरले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे ३ जानेवारी रोजी ३०० उमेदवारांना प्रवेशपत्रे देऊन मैदानी चाचणीसाठी बोलावण्यात आले होते. त्यापैकी २१४ उमेदवार हजर राहिले, तर ८६ उमेदवार गैरहजर राहिले. दुसऱ्या दिवशी १६९ उमेदवार पात्र ठरले, तर ४५ उमेदवार अपात्र ठरले. उर्वरित भरती प्रक्रिया ७ व ८ जानेवारी रोजी पार पडणार आहे. ७ जानेवारीला ३०० उमेदवार, तर ८ जानेवारीला २७८ उमेदवारांची भरती प्रक्रिया पडेल. सदर भरती प्रक्रियेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना १० जानेवारी रोजी वाहन कौशल्य चाचणीसाठी बोलावण्यात येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.