आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुदतवाढ:स्मार्टकार्ड योजनेला पाचव्यांदा मुदतवाढ

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एसटी महामंडळाने स्मार्ट कार्ड योजनेला पाच महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार स्मार्ट कार्ड काढायला प्रवाशांना ३१ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी शासनाकडून चार वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. २३ मार्च २०२० पासून राज्यासह देशभरात लॉक डाऊन असल्याने महामंडळाने सुरुवातीला स्मार्ट कार्ड योजनेला १४ ऑगस्ट २०२० पर्यंत मुदतवाढ दिली होती.

त्यानंतर तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब यांनी ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंतच मुदतवाढ दिल्याची घोषणा करून ज्येष्ठ नागरिकांना दिलासा दिला होता. तर वाहतूक महाव्यवस्थापक यांनी ३१ डिसेंबर २०२१ मध्ये तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली होती. तर वर्षारंभ एक व त्यानंतर आता पुन्हा पाचव्यांदा ३१ मार्चपर्यंत स्मार्ट कार्डला मुदतवाढ देण्यात आली आहे.याबाबतचे पत्र २८ ऑक्टोबर रोजी सर्व विभागांना दिले आहे. ज्येष्ठांसाठी अत्यंत महत्वाच्या स्मार्ट कार्ड योजनेला मुदत वाढीमुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बातम्या आणखी आहेत...