आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचे वाटप:अखेर बाप्पा पावला; जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना 529 कोटींची मदत

यवतमाळ24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. मदतीचा प्रस्ताव शासनदरबारी पाठवण्यात आला होता. अखेर शासनाने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचे वाटप होणार आहे. जिल्ह्याला ५२९ कोटी ६४ लाखांचा निधी दिला. त्याचप्रमाणे अवेळी पाऊस, गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ११ कोटी ४३ लाख रुपयांचा निधी दिला आहे.

जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात ३ लाख ८९ हजार ५५८ हेक्टर शेतपिकांचे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने वाढीव दराने ५२९ कोटी ९८ लाख रुपये निधी आणि खरडून गेलेल्या व गाळ साचल्याने बाधित झालेल्या शेत जमिनींसाठी ६ कोटी ५ लाख रुपये इतका निधी प्राप्त झाला आहे. जिल्ह्यात गतवर्षी डिसेंबर महिन्यात पाऊस, गारपीट झाल्याने राळेगाव, दिग्रस, तालुक्यांतील ११ हजार १०० हेक्टर शेतपिकांचे नुकसान झाले होते. यासाठी जिल्ह्याची मागणी प्रलंबित होती. जिल्ह्याला यासाठी ११ कोटी ४३ लक्ष ६२ इतका निधी मिळाला आहे. राज्य शासनाने एका शासन निर्णयान्वये अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मंजूर केली आहे.

यानुसार जिल्ह्यात तीन लाख ७८ हजार ३०१ शेतकऱ्यांना ३ लाख ८९ हजार ४४२ हेक्टर जिरायत बाधित क्षेत्रासाठी, ११६ शेतकऱ्यांना ७९ हेक्टर आश्वासित सिंचनाखालील बाधित क्षेत्रासाठी, ४४ शेतकऱ्यांच्या ३६.८५ हेक्टर बहुवार्षिक पिकाखालील बाधित क्षेत्रासाठी असे एकूण तीन लाख ७८ हजार ४६१ शेतकऱ्यांच्या ३ लाख ८९ हजार ५५८ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ५२९ कोटी ९८ लाख ७९ हजार रुपये अनुदान मदत मंजूर करण्यात आले आहे.

या मदतीमुळे शेतकऱ्यांना थोडा आधार मिळाला आहे. एकंदरीत शेवटच्या दिवशी विघ्नहर्ता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पावल्याचे स्पष्ट दिसत आहे. पुरामुळे शेतजमीन खरडून गेली. यासाठी ३ कोटी ५२ लाख ४२ हजार रुपये मदत म्हणून देण्यात येणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...