आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:अखेर दिग्रस न.प.पाणी पुरवठा विभागाला लावले कुलूप; दोन दिवसाआड पाणी पुरवठा करा अशी केली होती मागणी

दिग्रस2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिग्रस शहराला लागूनच अरुणावती धरण आहे. तरीही सुद्धा दिग्रस शहराला ११ ते १२ दिवसाआड पाणी पुरवठा एक तास होतो. या अरुणावती धरणात मुबलक पाणी साठा आहे. या धरणातून अकोला व वाशीम जिल्ह्याला पाणी पुरवठा केला जातो तर दिग्रस शहराला का नाही असा संतप्त सवाल भाजपा कामगार आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्या कल्पना मधुकर पवार यांनी केला आहे.

दिग्रस शहराला दोन दिवसाआड पाणी पुरवठा करा असा आशयाचे निवेदन नगर पालिकेला दि. ४ मे ला दिले होते. परंतु तसे होत नसल्याने अखेर कल्पना पवार यांनी ११ मे रोजी दुपारी ३:३० वाजताच्या सुमारास नगर पालिका पाणी पुरवठा विभागाला कुलूप ठोकले.

दिग्रस नगर पालिका पाणी पुरवठा विभाग कार्यालयात दिग्रस प्रभाग क्रमांक ४ च्या काही महिला पाणी टंचाईची समस्या घेऊन आल्या होत्या. या महिलांच्या पाणी समस्येबाबत पाणी पुरवठा विभागाचे अभियंता गौरव मांडळे यांना भेटण्यासाठी कल्पना पवार नप ला आल्या असता तेथे अभियंता मांडळे न आढळल्याने कु.कल्पना पवार हिने चक्क पाणी पुरवठा विभागाला कुलूप लावले. त्यावेळी पाणी पुरवठा विभागातील संगणक ऑपरेटर चेतन श्रीवास आत मध्ये कोंडल्या गेले होते. ते काही वेळाने मागील दरवाज्याने बाहेर आले.

जोपर्यंत दोन दिवसाआड पाणी पुरवठा समस्या दूर होणार नाही तोपर्यंत पाणी पुरवठा विभागाला लावलेले कुलूप उघडणार नाही असे मत भाजपा कामगार आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्या कल्पना पवार यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...