आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या महिनाभरापासून तालुक्यातील विविध भागांमध्ये धुमाकुळ घालुन नागरिकांवर हल्ले करणाऱ्या नरभक्षक वाघास पकडण्यात अखेर वन विभागाच्या पथकाला यश आले आहे. बुधवार दि. ७ डिसेंबर रोजी सकाळी वेकोलिच्या कोलार पिंपरी कोळसा खाणी लगत असलेल्या सबस्टेशनच्या बाजुला वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने त्या नरभक्षक वाघाला जेरबंद केले. वाघ पिंजऱ्यात बंद झाल्याची माहिती तालुक्यात पसरताच नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
वणी तालुक्यात वाघाची प्रचंड दहशत निर्माण झाली होती. परिसरातील नागरिकांना वेळोवेळी वाघांचे दर्शन होत होते. अनेकांची जनावरं वाघाने फस्त केली. एवढेच नाही तर वाघ नरभक्षक झाला होता. त्याने दोन मानवी शिकार केल्या, तर एकवार हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले.
वाघाच्या हल्ल्यात भुरकी येथील अभय देऊळकर व कोलेरा येथील रामदास पिदूरकर या दोघांचा नाहक बळी गेला. तर ब्राह्मणी येथे तात्पुरता निवारा करून राहणाऱ्या उमेश पासवान या परप्रांतीय मजुरांवर वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. त्यामुळे वणी तालुक्यातील नागरिक वाघाच्या दहशतीत वावरत होते. या नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्याकरिता वन विभागावर दबाव वाढला होता. राजकीय नेत्यांनी वन विभागाला चांगलेच धारेवर धरले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.