आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिढा सुटला:अखेर खुल्या मैदानाच्या सीमांकनाचा तिढा सुटला

यवतमाळ8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील वॉर्ड क्रमांक २३ मधील लक्ष्मीनगर परिसरातील ओपन स्पेसच्या मैदानाचे सीमांकन शुक्रवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी आटोपले. त्यामुळे वॉलकम्पाऊंडचा प्रश्न पूर्णत: निकाली निघाला आहे.

शहरातील वॉर्ड क्रमांक २३ मध्ये येणाऱ्या लक्ष्मी नगर परिसरात एक ओपन स्पेस आहे. तर त्या ओपन स्पेसला लागूनच महानंद नगर आहे. या ओपन स्पेसच्या कामाकरता विधान परिषद आमदाराच्या फंडातून २० लाख रूपये मंजूर झाले होते. त्या अनुषंगाने डिस्मेंटल, कॉलम, चेन लिंकिंग फेसिंग, वॉल कंम्पाऊंड, स्टील ग्रील, रंगरंगोटी, यासह इतरही कामे ह्या निधीच्या माध्यमातून करण्यात येणार होती. त्या अनुषंगाने प्रत्यक्षात कामाला सुरूवात झाली. हनुमान मंदिरालगतच्या भल्या मोठ्या वृक्षाची कत्तल करण्यात आली. तद्नंतर लक्ष्मी नगरच्या तिन्ही बाजूचे काम पूर्ण झाले आहे. वॉलकंम्पाऊडला प्रवेशव्दारसुद्धा बसविण्यात आले आहे, परंतू महानंद नगरातील बाजुचे काम अर्धवटरीत्या राहिले होते.

या ठिकाणी अतिक्रमण असल्यामुळे काम रेंगाळल्याचा आरोप नागरिकांतून केल्या जात होता. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी पालिकेकडे लेखी स्वरूपात तक्रारसुद्धा केली होती. तरीसुद्धा पालिकेने कुठलेही पावले उचलली नाही. शेवटी लोकशाही दिनात जिल्हाधिकाऱ्यांसमक्ष सुनावणी झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना काम त्वरीत सुरू करण्याबाबत आदेशित केले होते. पालिकेने प्रत्यक्षात काम सुरूच केले नाही. दुसऱ्यांदा केलेल्या तक्रारीनंतर सिमानिश्चितीचा मुद्दा समोर आला. त्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाला सुचना दिली. त्यांनी लगेच पालिकेला पत्र पाठवून सिमानिश्चितमुळे कामास अडथळा निर्माण

झाल्याचे सुचविले. तरीसुद्धा पालिकेने सीमा निश्चिती करून दिलीच नव्हती. त्यामुळे कंपाऊंडचे काम अर्धवट पडले होते. सिमानिश्चितीचा प्रश्न निकाली न निघाल्याने सध्या काम पूर्णपणे बंद पडले होते. शेवटी नगर पालिका आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी सीमा निश्चिती केली. आता सिमानिश्चितीमुळे प्रत्यक्षात कामाला सुरूवात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अर्ध्याहून अधिक देयके अदा
वॉल कंपाऊंडच्या कामासाठी २० लाख रूपये मंजूर करण्यात आले होते. प्रत्यक्षात कामाला सुरूवात झाली. अर्ध्याहून अधिक कामसुद्धा आटोपलं असून, चक्क जून महिन्यात ११ लाख २५ हजार रूपयांचे देयके कंत्राटदाराला अदा केली आहे. तेव्हापासून काम रखडलेले असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी लेखी स्वरूपात तक्रार केली होती.

बातम्या आणखी आहेत...