आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैदानावर होणार सामने:अखेर मैदानाचा तिढा सुटला, 26 पासून स्पर्धा

यवतमाळ8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तब्बल दोन वर्षांनंतर होवू घातलेल्या जिल्हा परिषद क्रीडा सामान्यांच्या तारखा मैदानाच्या अडचणींमुळे निश्चित झाल्याच नव्हत्या. शेवटी मैदानाचा तिढा मंगळवार, दि. २२ नोव्हेंबर रोजी निकाली निघाला. शहरातील नंदुरकर विद्यालयाच्या मैदानावर २६ ते २९ नोव्हेंबर ह्या कालावधीत क्रिकेटचे सामने होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोविड-१९ च्या वाढलेल्या संसर्गामुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम होवू शकले नाही. आता कोविडचे निर्बंध पूर्णत: उठले आहे. त्यामुळे यंदा क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यास ग्रीन सिग्नल प्रशासनाकडून मिळाला आहे. भरीसभर यंदा विभागीय क्रीडा सामन्याचे आयोजक पद यवतमाळ जिल्हा परिषदेला मिळाले आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद कर्मचारी क्रीडा मंडळाची सभा नुकतीच पार पडली. मंडळाचे अध्यक्ष सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंकज भोयर आहे.

उपाध्यक्ष शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी ज्योती भोंडे, तर सचिवपदी प्रकाश येरमे, क्रीडा प्रमुख संदीप शिवरामवार आदींची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, क्रीडा सामन्यांच्या तारखा दोन ते तीन वेळा निश्चित झाल्या होत्या. मात्र, सामने घेण्याकरिता मैदान उपलब्ध नव्हत. परिणामी, तारखांवर शिक्कामोर्तब होवूच शकला नाही. दरवर्षी शहरातील मध्यवस्तीत असलेल्या हेलिपॅड मैदानावर जिल्हा परिषद क्रीडा सामने घेण्यास जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी हिरवी झेंडी दाखवलीच नाही.

शेवटी क्रीडा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवार, दि. २१ नोव्हेंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट घेतली. त्यांनी पोलिस अधीक्षकांशी चर्चा केली. मात्र, हेलीपॅड मैदानात वाढलेले गवत आणि खराब झालेल्या ट्रॅकमुळे पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट नकार दिला. शेवटी शहरातील नंदुरकर विद्यालयाच्या मैदानावर सामने घेण्यास मंगळवार, दि. २२ नोव्हेंबर रोजी शिक्कामोर्तब झाला आहे. दरम्यान, दि. २६ ते २९ नोव्हेंबर रोजी ह्या कालावधीत क्रीडा सामने होणार आहे. शनिवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी स्पर्धेला सुरूवात होणार आहे.

दुसऱ्यांदा घेतली एसपींची भेट
दरवर्षी हेलिपॅड मैदानावर जिल्हा परिषदेच्या क्रीडा सामने होतात. यंदा मात्र, हेलीपॅड मैदानावर मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. परिणामी, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी नकार दर्शविला होता. क्रीडा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी २१ नोव्हेंबर रोजी सीईओंच्या चर्चेनंतर अधीक्षकांची भेट घेतली. त्यांनी नकार दिला.
विभागीय क्रीडा स्पर्धेचे यवतमाळला यजमानपद
अमरावती विभागात जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या स्पर्धा होतात. त्यानंतर जिल्हा स्तरावर एका संघ तयार करून त्यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदा हे सामन्याचे यजमानपद यवतमाळ जिल्हा परिषदेला मिळाले आहे. त्यामुळे यवतमाळकरांसाठी ही एक पर्वणीच म्हणावी लागेल.

बातम्या आणखी आहेत...