आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारुग्णालयात रुग्णाकडुन डॉक्टरवर करण्यात आलेल्या चाकुहल्ल्याच्या घटनेनंतर महाविद्यालयात शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी संप पुकारला होता. त्याचे पडसाद उमटून रुग्णसेवा कोलमडली होती. मात्र यासंदर्भात झालेल्या वाटाघाटी आणि चर्चेनंतर शुक्रवार दि. ६ जानेवारी रोजी रात्री हा संप मागे घेण्याचा निर्णय निवासी डॉक्टरांच्या मार्ड या संघटनेने घेतला. त्यामुळे त्याच दिवशी रात्रीपासून रुग्णसेवा पूर्ववत सुरू करण्यात आली. जिल्हा रुग्णालयातील वार्ड क्रमांक २५ मध्ये उपचार घेत असलेल्या सूरज ठाकुर या रुग्णाने त्याची तपासणी करण्यासाठी गेलेल्या दोन डॉक्टरांवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात डॉ. अभिषेक झा आणि जेबीस्टल पॉल हे दोघे जखमी झाले होते.
या घटनेनंतर लगेच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी लगेच कामबंद आंदोलन सुरू करीत जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला. गुरूवारी रात्री घडलेल्या या घटनेचे तीव्र पडसाद दुसऱ्या दिवशी दिवसभर उमटले होते. आंदोलकांनी जिल्हा रुग्णालयाचे प्रवेशद्वार बंद करुन ठेवल्याने कुठल्याही रुग्णाला रुग्णालयात येता येत नव्हते. इतकेच नव्हे तर रुग्णालयातुनही कुणाला बाहेर जावु देण्यात येत नव्हते. या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेची लक्तरे पुन्हा एकदा वेशीवर टांगल्या गेली होती.
दरम्यान रुग्णालयातील अपुरी सुरक्षा व्यवस्था, डॉक्टरांवर वारंवार होणारे हल्ले आणि इतर समस्यांच्या निराकरणासाठी मार्ड या संघटनेने १३ मागण्या प्रशासनापुढे मांडल्या होत्या. या मागण्या तातडीने मान्य करण्यात येवुन त्यातील सुरक्षेच्या संदर्भात स्थानिक प्रशासनाच्या स्तरावर असलेल्या मागण्या लगेच पुर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले.
त्यात जिल्हा रुग्णालयात एक पोलिस अधिकारी आणि काही कर्मचारी यांची नेमणूक करुन कायमस्वरुपी पोलिस चौकी तयार करण्यात येणार आहे. याशीवाय इतर काही मागण्या देखील लगेच अंमलात आणण्यात येणार आहे. या सर्व मागण्यांसंदर्भात शुक्रवारी दिवसभरात झालेल्या चर्चेनंतर रात्री हा संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शनिवार दि. ७ रोजी जिल्हा रुग्णालयात रुग्णसेवा सुरळीत सुरू झालेली दिसुन आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.