आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनयात्रा:शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना आर्थिक मदत ; सांत्वन करत दिले धनादेश

मारेगाव21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात पोळ्याच्या पर्वावर सात शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याच्या धक्कादायक घटना घडल्या. याची दखल घेत सोमवार, ५ सप्टेंबर रोजी आ. बोदकुरवार यांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांच्या भेटी घेत त्यांचे सांत्वन केले व त्यांना आर्थिक मदत प्रदान केली.

तालुक्यात अतिवृष्टी कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. जुलै, आगस्ट मध्ये झालेल्या महापूर व व अतिवृष्टी शेतकऱ्यांची पिके वाहून गेली. शेत खरडून गेली त्यामुळे पोळ्याच्या पर्वावर लागोपाठ सात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आमदार बोदकुरवार यांनी सतीश बोथले म्हैसदोडका, गजानन मुसळे, हरिदास टोनपे, सचिन बोढेकर, पुंडलिक रुयारकर, तोताराम चिंचुलकर, दांडगाव, अविनाश मेश्राम वेगाव या आत्महत्या ग्रस्त कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. आणि आर्थिक मदत केली. तसेच शासकीय मदतीचे आश्वासन दिले. यावेळेस भाजपा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, शारदा पांडे, सह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...