आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीकरण:लसीकरण पूर्ण केल्याबद्दल ईरथळ गाव तालुक्यात प्रथम; त्कृष्ट कार्य केल्याबद्दल तालुक्यातून प्रथम पुरस्काराने गौरवण्यात आले

दारव्हा16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरोग्य विभाग जिल्हा परिषद, कवचकुंडल अभियानांतर्गत ग्रामपंचायतस्तरीय पुरस्कार १ मे रोजी जिल्हा परिषद सभागृहात पार पडला. ग्रामपंचायतस्तरीय पुरस्कारांमध्ये दारव्हा तालुक्यातील ईरथळ गावाला कोविड लसीकरणपूर्ण उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल तालुक्यातून प्रथम पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

जिल्ह्याचा लसीकरणाचा टक्का अधिक वाढविण्यासाठी व शंभर टक्के पात्र लोकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात मिशन कवचकुंडल अभियान हाती घेण्यात आले होते. या अंतर्गत ग्रामीण भागात सर्व तालुके, नगरपालिकांमध्ये जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी विशेष ‘सप्तपदी निश्चित केली होती. पालकमंत्री संदीपान भुमरे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. यावेळी पोलीस पाटील उमेश दरेकर, सरपंच अनिता चौधरी, श्याम राठोड, ज्योती गावंडे, वंदना ठवक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...