आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मत्स्यव्यवसाय:मत्स्यव्यवसाय विभागाची कोंघारा येथील प्रतिबंधित मागूर मत्स्यसंवर्धनावर कारवाई

पांढरकवडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मत्स्यपालन करण्यास प्रतिबंध असलेल्या थाई मागूर प्रजातीच्या माशाचे केळापूर तालुक्यातील कोंघारा येथे मत्स्य संवर्धन करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून मत्स्यव्यवसाय विभागाच्या पथकाने कोंघारा येथे जावुन संबंधीत मत्स्यसाठा ताब्यात घेत नष्ट केला. ही कारवाई मंगळवार दि. २४ मे रोजी करण्यात आली. हरित लवाद नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार थाई मागूर माश्याचे प्रजनन, मत्स्यपालन व विक्री करण्यावर बंदी असून सदर माश्याचे अस्तित्वात असलेले मत्स्य साठे नष्ट करण्याचे निर्देश आहेत. थाई मागूर हा मासा अतिषय प्रतिकुल परिपरिस्थितीत वाढतो शिवाय तो सर्वभक्षी आहे. त्यामुळे तो इतर स्थानिक माशांच्या प्रजातीसाठी धोकादायक आहे. त्यामुळे केंद्र शासनाने या माशांच्या प्रजनन व मत्स्य पालन यावर बंदी आनली आहे. त्यानंतरही काही औषधी गुणधर्म आणि विशीष्ट चव यामुळे काही ठिकाणी त्याला मागणी असते. अशा या थाई मागूर माशांचे उत्पादन तालुक्यातील कोंघारा या ठिकाणी सुरू होते. त्याच्या माहितीनुसार मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी न. या. पिंगलवार व शि. अ. चव्हाण तसेच पांढरवकडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमराज कोळी व कॉन्स्टेबल सिदार्थ कांबळे यांच्या उपस्थितीत कोंघारा येथे कारवाई केली. त्यात प्रतिबंधित मत्स्य साठा जप्त करुन तो शेतालगतच्या खड्डयात शास्रोक्त पद्धतीने पुरून नष्ट करण्यात आला. ही माहिती मत्स्यव्यवसाय सहायक आयुक्त सु. वा. जांभुळे यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...