आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोंद:जिल्ह्यात कोरोनाचे आढळले‎ पाच नवे रुग्ण; 21 सक्रिय‎

यवतमाळ‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या आठवडाभरापासून‎ कोराेनाबाधितांच्या संख्येत वाढ‎ होत आहे. अशात रविवार, ९‎ एप्रिल रोजी ४२९ जणांची कोरोना‎ चाचणी करण्यात आली. यात‎ नव्याने ५ जण काेराेना बाधित‎ आढळून आले. पूर्वीचे १६ आणि‎ नवे ५, असे मिळून २१ अॅक्टिव्ह‎ रुग्णांची नोंद झाली आहे.‎ बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर‎ कोराेनाने पुन्हा डोके वर‎ काढल्याचे स्पष्ट दिसत आहे.‎ मागील आठवड्यात एकाच‎ दिवशी तब्बल १० बाधित रुग्ण‎ आढळले होते. त्यामुळे त्रिसूत्रीचे‎ पालन करावे, असे आवाहन‎ जिल्हा प्रशासनाने केले आहे.‎ अशात सर्दी, खोकला, ताप आदी‎ रुग्णांच्या नियमित कोराेना‎ चाचण्या केल्या जात आहेत.‎

रविवार, ९ एप्रिल रोजी ४२९‎ जणांची कोराेना चाचणी केली.‎ यात ४२४ जणांच्या चाचण्या‎ निगेटिव्ह आल्या असून, पाच जण‎ पॉझिटिव्ह आले. पॉझिटिव्ह‎ आलेल्यांमध्ये आर्णी, यवतमाळ‎ व इतर शहरातील प्रत्येकी एक‎ आणि दिग्रस तालुक्यातील दोन,‎ असे मिळून पाच रुग्णांचा समावेश‎ आहे. सध्या दोन रुग्ण‎ होमआयसोलेट आहेत. तर १७‎ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू‎ असून, उर्वरित दोघे परजिल्ह्यात‎ उपचार घेत आहेत. कोराेनाचे‎ रुग्ण वाढत असल्यामुळे‎ प्रशासनाची चिंता वाढली आहे.‎ तरीसुद्धा उपाययोजनांच्या‎ अनुषंगाने शासन स्तरावरून‎ कुठल्याही प्रकारचे निर्देश प्राप्त‎ झाले नाही. परंतु सातत्याने वाढत‎ असलेल्या रुग्णांमुळे येत्या काही‎ दिवसांत निर्देश प्राप्त होण्याची‎ शक्यता आरोग्य विभागाने‎ वर्तवली आहे.‎