आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळ:शहरात ‘जिल्हाध्यक्ष हटाव, राष्ट्रवादी बचाव’चे झळकले फलक

यवतमाळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पक्षातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर; राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरद पवार विभागीय आढावा घेण्यासाठी अमरावती येथे दि. १० एप्रिलला येत आहे. त्या अनुषंगाने रविवार, दि. ३ एप्रिलला जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी शहरातील साईसत्य ज्योत मंगल कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या ठिकाणी ‘जिल्हाध्यक्ष हटाव, राष्ट्रवादी बचाव’चे फलक झळकले. त्यामुळे पक्षातील अतंर्गतकलह चव्हाट्यावर आला आहे.

आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातल्या आहे. यासाठी पक्षसंघटन बळकट करण्यासाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार पुढील आठवड्यात अमरावती येथे येणार आहे. याठिकाणी ते अमरावती विभागातील पक्षाचा आढावा घेणार आहेत. तत्पूर्वी अमरावती विभागाचे समन्वयक संजय खोडके यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात रविवारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

बैठकीला निरीक्षक अशोक परळीकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम स्थळासह अनेक ठिकाणी ‘जिल्हाध्यक्ष हटाव,राष्ट्रवादी बचाव’ फलक लावण्यात आले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली. या फलकबाजीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलह निवडणुकीपूर्वी चव्हाट्यावर आला आहे. काही वेळानंतर लावण्यात आलेले बॅनर हटवण्यात आले. असे असले तरी नेत्यांपुढे घडलेल्या या प्रकारामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस वाढल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी सुरू होती.

बातम्या आणखी आहेत...