आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:महादीप’तून घेता येणार विद्यार्थ्यांना ‘उडाण

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पर्धा परीक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी, स्वयंअध्ययनातून गुणवत्ता विकास व्हावा, सोबतच स्पर्धा परीक्षेची माहिती व्हावी हे उद्दिष्ट ठेवून शालेय अभ्यासक्रम तथा सामान्य ज्ञानाशी सांगड घालणारी महादीप परीक्षेची पहिली फेरी बुधवार, दि. ७ डिसेंबर रोजी असून, टप्प्या-टप्प्याने उर्वरीत फेऱ्या होणार आहे. पाचवी आणि आठवीचे विद्यार्थी ह्यात सहभागी होणार आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने दरवर्षी महादीप परीक्षेचे आयोजन केल्या जात आहे. यंदा ह्या परीक्षेचे वेळापत्रक शिक्षण विभागाने जाहीर केले. या परीक्षेत पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. शाळास्तरावर तीन फेऱ्या होणार आहे. पाहिली फेरी ७ डिसेंबर २०२२ ला होणार असून, ह्यात महाराष्ट्र, भारत आणि जग आहे.

यात १४ डिसेंबरला दूसरी फेरी होणार आहे. ही परीक्षा विज्ञान व सामान्य ज्ञान ह्यावर आधारीत आहे. तर २१ डिसेंबरला मराठी इंग्रजी भाषा गणित, बुद्धिमत्ता या अभ्यासक्रमावर आधारित प्रत्येकी ५० गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे. यात प्रत्येक फेरीत ५० टक्के गुण मिळालेले विद्यार्थी पुढील फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. चौथी फेरी केंद्र स्तरावर ३१ डिसेंबर ला होणार असून, यात महादीप पुस्तिका भाग एक आणि दोन सोबत शाळा स्तरावरील फेऱ्यात झालेल्या सर्व अभ्यासक्रमावर आधारित ५० गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे. एकूण ७० टक्के गुण मिळवणाऱ्या पाहिल्या ५ विद्यार्थ्यांना पुढील फेरीसाठी निवडण्यात येणार आहे.

केंद्रस्तरावर निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना तालुकास्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. पाचवी फेरी १० जानेवारी २०२३ ला होईल. या फेरीत ७० टक्केपेक्षा अधिक गुण मिळवून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची सहावी फेरी तालुका स्तरावरच घेण्यात येणार आहे. या फेरीतून ७० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय अंतिम फेरीत सहभागी होण्याची संधी आहे. ही अंतिम फेरी १० फेब्रुवारी २०२३ ला होणार असून, या जिल्हास्तरीय स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांना विमान वारी करण्याची संधी मिळणार आहे. ही परीक्षाे पार पाडण्यासाठी शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात टीम परिश्रम घेत आहे.

तर विद्यार्थ्यांनीसुद्धा परिश्रम घ्यावे
विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व व गुणवत्ता विकास करणाऱ्या ह्या संधीचा गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक तथा शिक्षकांनी शाळेतील विद्यार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा. तर विद्यार्थ्यांनीसुद्धा परिश्रम पणाला लावणे गरजेचे आहे.डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

बातम्या आणखी आहेत...