आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन:माणुसकीची भिंतच्या वतीने जेवणाचे वाटप

पुसद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोयरा धायरा ग्रुप कडून अण्णाभाऊ साठे जयंती निमित्य माणुसकीची भिंत मदत केंद्र उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना जेवण व फळे वाटप करून अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

माणुसकीची भिंत मदत केंद्र येथे महापुरुषांच्या जयंतीनिमित्त सणानिमित्त वाढदिवसानिमित्त दररोज रुग्णालयातील रुग्ण व त्यांची नातेवाईक व बेघर गरजूंना मोफत अन्नदान करण्यात येत आहे. यावेळी डॉ. प्रदीप निलावार, माणुसकीची भिंत टीमचे सर्व पदाधिकारी व सदस्य सोयरा धायरा ग्रुपचे सर्व सदस्य, मित्र मंडळ ब्लड डायरीचे मारोती भस्मे, किशोर कांबळे व इतर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...