आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकल्प फाउंडेशनचा सेवाभावी उपक्रम:एका फोन कॉलवर पोहोचते 50 लोकांचे जेवण

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मृत्यु झालेल्या घरात अंत्यविधीच्या दिवशी एका कॉलवर सुमारे ५० ते ७० लोकांना पुरेल इतके जेवण एका कॉलवर उपलब्ध करुन देण्याचा नवा उपक्रम संकल्प फाउंडेशनच्या वतीने राबवण्यात येत आहे. शिव भावे, जिव सेवा, संकल्प भोजन सेवा असे या उपक्रमाचे नाव ठेवण्यात आले असुन आतापर्यंत १८२ परिवारांना ही सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

भारतीय संस्कृती नुसार एखाद्या परिवारात कुणाचा मृत्यु झाल्यास त्या दिवशी त्यांच्या घरी चुल पेटत नाही एखाद्याचा मृत्यु झाल्यास त्या दिवशी त्यांच्या घरात चुल पेटत नाही. अशावेळी त्या परिवाराचे आप्तस्वकीय, नातलग, परिसरातील नागरिक किंवा मित्रमंडळी त्या परिवाराच्या आणि अंत्यविधीसाठी आलेल्या त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची व्यवस्था करीत असतात. मात्र गेल्या काही वर्षात ही प्रथा जवळपास बंद पडत चालली आहे. कोरोना नंतरच्या काळात तर परिस्थिती बिकट झाली आहे.

जे परिवार कामानिमित्त शहरात राहतात. किंवा ज्यांचे आप्तस्वकीय या ठिकाणी राहत नाही अशा स्थितीत त्या घरात कुणाचा मृत्यु झाल्यास परिवारातील सदस्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. ही अडचण लक्षात घेता संकल्प फाउंडेशनच्या वतीने अशा परिवारांसाठी शिव भावे, जिव सेवा, संकल्प भोजन सेवा या नावाने सेवा सुरू केली आहे.

या माध्यमातुन एखाद्या परिवारात कुणाचा मृत्यु झाला आणि त्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था करण्यासाठी कुणी नसल्यास अशा परिवारांना केवळ एका कॉलवर काही वेळातच ५० ते ७० लोकांना पुरेल इतक्या जेवणाचा डबा पोहोचवण्यात येतो. यवतमाळ शहराच्या कुठल्याही परिसरातील नगरात, कोणत्याही जाती, धर्माच्या कुटुंबास ही सेवा निरंतर देण्यासाठी संकल्पचे सदस्य काम करीत आहेत. या कामासाठी लोकसहभागाची मोठी मदत संकल्प फाउंडेशनचा मिळत आहे. जानेवारी २०२२ मध्ये सुरू केलेल्या या सेवेच्या माध्यमातुन आतापर्यंत तब्बल १८२ परिवारांना दु:खाच्या प्रसंगी भोजन पोहोचवून सेवा दिली आहे.

केवळ तीन तासात पोहोचवतो भोजन
संकल्पच्या वतीने राबवण्यात येत असलेला हा उपक्रम लोकसहभागातून कार्यरत होतो. ह्या भोजन सेवेसाठी आवश्यक असलेले धान्य,किराणा,भाजीपाला,तेल अश्या सर्व वस्तू दानशूर व्यक्तींच्या दातृत्वमुळे प्राप्त होतात. आपल्या आजूबाजूला कोणत्याही वर्गीय कुटुंबात दुःखद घटना घडल्यास संकल्प भोजन सेवेसाठी ९०४९५४९५६६, ८९९९८४४५०५ या क्रमांकावर संपर्क साधावा.- प्रलय टीप्रमवार, संकल्प फाऊंडेशन, यवतमाळ

बातम्या आणखी आहेत...