आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यासह संपुर्ण सहकार क्षेत्राचे लक्ष लागुन असलेल्या यवतमाळ अर्बन बँकेची सार्वत्रिक निवडणुक यंदा अविरोध करण्यात अखेर यश आले आहे. विशेष म्हणजे यवतमाळ अर्बन बँकेच्या ३६ वर्षांच्या इतिहासात प्रथमच बँकेची निवडणूक अविरोध पार पडली आहे. मात्र ही निवडणुक अविरोध करण्यासाठी बँकेच्या संचालकांसह संघ परिवार आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांना चांगलीच मेहनत घ्यावी लागली . यवतमाळ अर्बन बँकेत संघ परिवार आणि भाजपा यांच्याशी निगडीत असलेल्यांनाच संचालक पदावर संधी देण्यात येते. असे असले तरी बँकेच्या निवडणुकीच्या वेळी बँक काबीज करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या काही गटांकडून निवडणुकीत उमेदवार उभे करण्यात येतात. गेल्या काही वर्षात बँकेने केलेल्या प्रगतीमुळे बँकेचा व्याप वाढला असुन सध्या बँक सुस्थितीत आहे. इतकेच नव्हे तर विदर्भातील अग्रगण्य अर्बन बँक म्हणुन बँकेकडे पाहण्यात येते. ही बाब लक्षात घेता यंदाही बँकेच्या निवडणुकीसाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यामुळे बँकेचे संचालक मंडळ, संघ परिवार आणि भाजपा यांच्याकडून यंदाची निवडणुक अविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. बँकेची निवडणूक जाहीर होताच संचालक पदाच्या १६ जागांसाठी २७ अर्ज दाखल झाले होते. अर्ज मागे घेण्यासाठी असलेल्या ७ जुन या शेवटच्या दिवशी १६ अर्जांव्यतिरिक्त इतर अर्ज मागे घेण्याची प्रक्रीया सुरू झाली.
या जुन्या संचालकांना बदलले बँकेत यंदाच्या निवडणुकीत जुन्या संचालकांपैकी मोहनराव देव, कांताभाऊ रानडे, संजय पालतेवार, संजय सरनाइक, सुदर्शन कदम या पाच संचालकांना ब्रेक देण्यात आला आहे. तर संचालक वैदेही नायगावकर यांचा मृत्यु झाला आणि संचालक गणपत लेडांगे यांच्यावर निवडणुकीनंतर झालेल्या आक्षेपानंतर संचालक पदाची त्यांची निवड रद्द झाली. या कारणांमुळे रिक्त झालेल्या दोन जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात अली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.